शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

माझी छाती उघडून बघा, ‘धनुष्यबाण’च दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 01:09 IST

कोल्हापूर : ‘माझी छाती जरी उघडून बघितली तरी तुम्हाला धनुष्यबाणच दिसेल,’ असे सांगत देशाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र ...

कोल्हापूर : ‘माझी छाती जरी उघडून बघितली तरी तुम्हाला धनुष्यबाणच दिसेल,’ असे सांगत देशाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक असल्याने अन्य कोणताही विचार मनात न आणता प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करण्यासाठी राबणूक करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.पाच दिवसांच्या अंतराने कोल्हापुरात आलेल्या पाटील यांनी सकाळपासूनच भेटीगाठींचे सत्र सुरू केले. पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी गुरुवारी सकाळी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मंत्री पाटील सभेसाठी गारगोटीकडे रवाना झाले. दुपारनंतर ते येथील एका हॉटेलवर नियोजित बैठकीसाठी उपस्थित राहिले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये ज्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना पाटील यांनी सहकार्याचा हात दिला आहे, अशा संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते.पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत सरकार येण्याची गरज का आहे, याचे विश्लेषण केले.राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. महेश जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप देसाई, अभयकुमार साळुंखे, अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, संतोष गायकवाड, हरिभाई पटेल, भावेश पटेल यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यानंतर हातकणंगले तालुक्यातील सभांसाठी पाटील रवाना झाले. शुक्रवारी दिवसभर ते माढा मतदारसंघात थांबणार असून, शनिवारी दिवसभर कोल्हापुरातील मंडल बैठकांना उपस्थित राहून सायंकाळी गडहिंग्लजला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.