सरूड : येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी केवल किरण यादव याने शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात घवघवीत यश संपादन केले. शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात त्याने कातरकाम व भित्तीचित्र या कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला तर शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवात कातरकाम या कलाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही स्पर्धा आभासी पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. केवलचे संस्थाध्यक्ष व माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरुडकर, युवा नेते युवराज पाटील, प्राचार्य डाॅ. जी. एच. आळतेकर यांनी अभिनंदन केले. त्याला सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रकाश नाईक, डाॅ. के. ए. पाटील, प्रा. ज्योती थोरात, प्रा. नीलेश घोलप, प्रा. रघुनाथ मुडळे, एस. डी. कांबळे यांचे सहकार्य लाभले.
केवल यादवचे युवा महोत्सवामध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST