गगनबावडा : विद्या मदिर शेळोशी या केंद्रशाळेत १ते ७ वर्ग असुन ६४ पटसंख्या असणाऱ्या या शाळेत शिक्षकांची चार पदे मंजुर आहेत. यापैकी एक शिक्षक क्रिडाप्रबोधनि शिंगणापुर येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या तिन वषार्पासुन कार्यरत आहे. राहिलेल्या तिन पैकी एका शिक्षकाची आठ दिवसापुर्वी जिल्हा बदली झाली आहे. एक शिक्षक कोल्हापूर येथेसात दिवसांच्या ट्रेनिंगला गेल्याचे समजते. राहिलेला एक शिक्षक सात वर्ग सांभाळणार कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या गगनबावड्यात धुव्वाधार पाऊस पडत असल्यामुळे शाळेच्या वर्गखोल्यामध्ये पाणी येत आहे .वर्गखोलीत सतत पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वर्ग सात माञ, एक शिक्षक वर्ग चालवणार कसे हा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? गटशिक्षणअधिकारी यांनी तात्काळ पयार्यी व्यवस्था करावी अशी मागणी शाळा व्यावस्थापण समितीचे अध्यक्ष संभाजी कांबळे यांनी केली आहे.शिक्षकाबाबत सतत पाठपुरावा करुणहि शिक्षण विभाग चालढकल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांसह अध्यक्ष कांबळे यांनी केला आहे.
वर्ग सात शिक्षक मात्र एक ; शेळोशी विद्या मंदिरची दयनिय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:10 IST