शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २७ व ५१ टक्के मतदान

By admin | Updated: June 21, 2014 00:43 IST

जेमतेम मतदान : पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक

कोल्हापूर : विधान परिषदेच्या आज, शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात २७ टक्के तर शिक्षक मतदारसंघात ५१ टक्के मतदान झाले. मतदारयादीतील घोळामुळे दोन्ही मतदारसंघांत कमी मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदारयादीतून नावे गहाळ झाल्याने मतदारांमधून जिल्हा प्रशासनाविरुद्ध यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदारयादीत नावांचा घोळ झाल्याने मतदारांना मोठी पायपीट व धावपळ करावी लागली. त्याच्या परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाली. पदवीधर मतदारसंघातील १ लाख २० हजार ८१३ मतदारांपैकी ३३ हजार १५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर शिक्षक मतदारसंघात ९६६२ मतदारांपैकी ६४०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणाऱ्या पुरुष शिक्षकांची संख्या ५२२० तर महिला शिक्षकांची संख्या ११८५ इतकी आहे. मतदारयादीवर अनेक मतदार, उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सायंकाळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आपल्याकडे भारतीय जनता पक्षाची एक तक्रार आली आहे. मतदारयादीतील अनेक नावे गायब असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली त्यावेळी आम्ही हरकती मागविल्या होत्या. ज्यांनी हरकती घेतल्या त्यांच्या नावांच्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यादीबाबत ज्या काही तक्रारी आहेत त्या पुराव्यासह दिल्यास त्याची चौकशी करता येईल. दरम्यान, मतदानानंतर मतपेट्या रात्री शासकीय गोदामात आणण्यात आल्या. तेथून त्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुण्याला रात्री उशिरा नेण्यात आल्या. पन्हाळ्याचे प्रांत रवींद्र खाडे व करवीरचे प्रांत प्रशांत पाटील हे पोलीस बंदोबस्तात या मतपेट्या घेऊन पुण्याकडे रवाना झाले. २४ जूनला मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील (भाजप), सारंग पाटील (राष्ट्रवादी), प्रा. शरद पाटील हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आपले राजकीय भविष्य आजमावून पाहात आहेत तर शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार भगवानराव साळोखे (भाजप-सेनाप्रणित), प्रा. दशरथ सगरे, गणपत तावरे (टीडीएफ), मानसिंग जगताप, प्रा. मोहन राजमाने, प्रतापसिंह देसाई आदी मान्यवर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (प्रतिनिधी)