शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

केवळ १२८ ग्रामपंचायतीत बँकिंग सेवा

By admin | Updated: May 13, 2015 00:52 IST

जिल्ह्यातील स्थिती : संगणकीय ग्रामीण महाराष्ट्राचा खेळखंडोबा

अशोक डोंबाळे -सांगली -केंद्र आणि राज्य शासनाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र करण्याच्या घोषणा देऊन, जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी डिसेंबर २०१४ पर्यंत बँकिंग सेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले होते. प्रत्यक्षात पाच महिन्यांनंतर प्रशासनाने आढावा घेतला असता, केवळ १२८ ग्रामपंचायतींमध्येच बँकिंग सेवा सुरू झाली आहे. उर्वरित ३२४ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरूच नसल्याचे दिसत आहे. संग्राम कक्षाकडील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकिंग सेवेचे कामकाज ठप्प असल्याचे प्रशासनाकडून जुजबी उत्तर मिळत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये बँकिंग सेवा सुरू नाही. यामुळे तेथील ग्रामस्थांना वीजबिल, एलआयसी हप्ता, पैशाची देवाण-घेवाण आदी व्यवहार करता येत नव्हते. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी बँकिंग सेवा देण्यासाठी सहकार्य करावे, अशी भूमिका घेतली होती. संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बँकिंग सेवा देण्याचे शासनाने सहा महिन्यांपूर्वी धोरण ठरविले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या होत्या. जिल्ह्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायतींपैकी ४५२ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा देणे शक्य होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये डिसेंबर २०१४ पर्यंत बँकिंग सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडियासह सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरु करण्यास अनुमती दिली होती. या ठिकाणी खात्यावर पैसे भरणे आणि काढणे, एलआयसीचा हप्ता भरणे, वीज बिल भरण्यासह सेवा दिल्या जाणार होत्या. आता जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरु झाली आहे. तेथे ३३ हजार ८२१ ग्राहक लाभ घेत आहेत. परंतु, काही राष्ट्रीय बँका आणि संग्रामकडील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ३२४ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा अद्याप सुरू झालेली नाही. बँकिंग सेवेची सद्यस्थितीतालुका निवड झालेल्याबँकिंगखातेदारग्रामपंचायतीसेवासंख्याआटपाडी२८४२४८जत३०१७७५४२क़महांकाळ३८३२६८खानापूर४९३३२५८पलूस३८१२२५५८मिरज५३१३३९४५कडेगाव३३१२३८५६शिराळा३९११२५८९तासगाव५५२४१६८७वाळवा८९२९७८९२एकूण४५२१२८३३८२१जनतेतून नाराजीशासन गावात बॅँकिंग सेवा सुरू करून देणार, या आशेवर असणाऱ्या ग्रामीण जनतेची निराशा झाली आहे. याबद्दल जनतेतून नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.