इचलकरंजी : येथील खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाइट कॉलेजमध्ये 'भारतीय उच्चशिक्षण क्षेत्रापुढे असलेली आव्हाने' या विषयावर एकदिवसीय ई-कॉन्फरन्स झाली. कॉन्फरन्समध्ये देशाच्या विविध महाविद्यालये व विद्यापीठांमधून १२५ अधिव्याख्यात्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. सुरुवातीला डॉ. प्रवीण सप्तर्षी यांचे बीजभाषण झाले. त्यानंतर पार पडलेल्या तीन सत्रांमध्ये अनुक्रमे डॉ. महावीर कोथळे (कर्नाटक), सचिन तेरे (यूएई), डॉ. अनुज कुमार (नागालॅँड), डॉ. जोतीराम मोरे (पुणे), डॉ. कपिलकुमार गावसकर (वाराणसी), डॉ. व्ही. वामसी कृष्णा रेड्डी (हैद्राबाद), डॉ. एन. आर. पाटील (सदलगा), डॉ. व्ही. एल. पाटील (कोल्हापूर) या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. समारोप सत्रामध्ये डॉ. भीमराव बनसोडे यांचे भाषण झाले.
प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चासत्रातील संशोधन पेपर, प्रश्नोत्तरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या बाबींचा लाभ शासन, विद्यार्थी, पालक व उद्योजकांना होणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष अरुण खंजिरे यांनी स्वागत केले.