शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:52 IST

किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.

ठळक मुद्दे कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली भाजीपाला स्थिर, पण कडधान्य तेजीत

कोल्हापूर : परतीच्या पावसाने नवीन कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याने कांद्याने कमालीची उसळी खाल्ली आहे. किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.गेले वर्षभर कांदा २० ते २५ रुपये किलो राहिला. मध्यंतरी कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. गेले पंधरा-वीस दिवस परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून, कोल्हापूर बाजार समितीत ५४७० पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे दराने उसळी खाल्ली असून, घाऊक बाजारात १५ ते ५५ रुपयांपर्यंत कांद्याचा दर आहे. पण किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपये दर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात सरासरी ३० रुपये किलोचा दर होता. त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी कांदाही ग्राहकांना दुय्यम प्रतीचा घ्यावा लागत आहे. बटाट्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांवर स्थिर असला तरी लसणाने मात्र भरारी घेतली आहे. घाऊक बाजारात ९० ते १८० रुपये किलोपर्यंत लसणाचा दर पोहोचला आहे.पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. भाजीपाला खराब झाला असला तरी आवक बऱ्यापैकी आहे. त्यामुळे दरात फारशी चढउतार दिसत नाही. वांगी ६० रुपये, टोमॅटो ३०, तर ढब्बू ४० रुपये किलो आहे. गवार, भेंडी, कारली, दोडक्याच्या दरात फारसा फरक दिसत नाही. फ्लॉवर व कोबीही ग्राहकांच्या आवाक्यात आहे. मेथीचे दरही वाढले असून, २० रुपये पेंढी आहे.फळमार्केटमध्ये सध्या सीताफळाची आवक वाढली आहे. दरातही घसरण झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलोपर्यंत दर आहे. सफरचंदबरोबर संत्री व मोसंबीची आवक चांगली आहे. दिवाळीनंतर वास्तविक कडधान्य मार्केट स्थिर राहणे अपेक्षित होते; पण मूग, मटकी, चवळी, काळा वाटाणा व पांढरा वाटाणाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे.

नवीन ज्वारी बाजारात आली असली तरी तीही दुय्यम प्रतीची आहे. एरव्ही २० रुपये असणारी ज्वारी ३० रुपये किलो आहे. सरकी तेल, तूरडाळ व हरभरा डाळीचे दर तुलनेत स्थिर राहिले असून, साखरेचा दर ४० रुपयांवर कायम राहिला आहे.कोथिंबीरची पेंढी ७० रुपये!पावसामुळे कोथिंबीरचे नुकसान झाले असून, तिच्या आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे एकदम उसळी घेतली असून किरकोळ बाजारात ७० रुपये पेंढीचा दर झाला आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर