शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या

By admin | Updated: September 23, 2016 00:36 IST

जतमध्ये घेतला गळफास : आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली, मृत उटगी येथील

जत : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण द्यावे’, असे लिहिले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.उटगी येथे बाळासाहेब चव्हाण व त्यांचा लहान भाऊ दिलीप (३५) यांची वडिलोपार्जित १५ एकर जिरायत शेतजमीन आहे. बाळासाहेब यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. पत्नी वैशाली, आई सुसाबाई, दोन मुले राघवेंद्र (८ वर्षे) व लक्ष्मण (१२) यांच्यासोबत ते भावापासून विभक्त राहत होते. त्यांच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. उटगीपासून दीड किलोमीटरवर त्यांची शेतजमीन आहे. तीन दिवसांपूर्वी, नातेवाइकांना भेटायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे त्यांची बहीण आहे. बहिणीजवळ त्यांनी एक दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही नातेवाइकांना भेटण्यासाठी ते गेले होते. बुधवारी सायंकाळी, उटगीला जात असल्याचे सांगून ते नातेवाइकांच्या घरातून बाहेर पडले होते. रात्री ते जतला आले. त्यानंतर जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी जतमधील काही लोक मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये चव्हाण गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोकांनी जत पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चव्हाण यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. चव्हाण यांच्या पिशवीतील साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली.या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आक्रोश करीत आले. जत आणि वळसंगमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चव्हाण कुटुंबप्रमुख होते, पण त्यांनीच आत्महत्या केल्याने या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन दुपारी चव्हाण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मच्छिंद्र बाबर यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (वार्ताहर)आरक्षण द्यावेचव्हाण यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात चिठ्ठी लिहिली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, पत्नी व मुलांचा व्यवस्थित सांभाळ करावा’, असा मजकूर चिठ्ठीत आहे. चव्हाण यांचा मुलगा राघवेंद्र पाचवीत, तर लक्ष्मण आठवीत शिकत आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. रात्री उशिरा उटगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पहिलीच घटना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. गेल्या पंधरवड्यापासून तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढले जात आहेत. सोलापुरात बुधवारीच मोर्चा काढला होता. चव्हाण बुधवारी सोलापुरातच होते, अशी माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे. सांगलीत २७ सप्टेंबरला मोर्चा निघणार आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी केलेली आत्महत्या, ही राज्यातील पहिलीच घटना आहे.