शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर थुंकल्यास हजार, मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 14:36 IST

CoronaVirus collector Kolhapur- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल पर्यंत रात्री बारावाजेपर्यंत वाढविण्यात आहे. याअंतर्गत रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असून या काळात चित्रपटगृह, मॉल्स, उपहारगृहे, सभागृह बंद राहतील. तसेच मास्क न घातल्यास पाचशे रुपये व रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी दिले.

ठळक मुद्देरस्त्यावर थुंकल्यास हजार, मास्क नसल्यास पाचशे रुपये दंडजिल्हयात रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जमावबंदी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल पर्यंत रात्री बारावाजेपर्यंत वाढविण्यात आहे. याअंतर्गत रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असून या काळात चित्रपटगृह, मॉल्स, उपहारगृहे, सभागृह बंद राहतील. तसेच मास्क न घातल्यास पाचशे रुपये व रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी दिले.रात्रीच्या जमावबंदी काळात हॉटेल्सची घरपोच सेवा व घेवून जाण्यास परवानगी राहील. मात्र सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी असेल. सभागृह, नाट्यगृहांमध्येही हे कार्यक्रम घेता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कोरोना संसर्ग असेपर्यंत सबंधित सिनेमा हॉल, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट, मालमत्ता बंद केले जातील. तसेच दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.सरकारी कार्यालयांमधील गर्दी कमी करण्यासाठी, लोकप्रतिनिधींव्यतिरीक्त, अतिमहत्वाची कामे नसलेल्या अभ्यागतांना शासकीय कार्यालयात येण्यास परवानगी असणार नाही. तसेच बैठकीसाठी बोलावण्यात आलेल्या अभ्यागतांना विभागाचे पत्र असल्याशिवाय बैठकीस प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार धर्मिक स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश द्यावा. तसेच दर्शनासाठी भेट देण्यासाठी ऑनलाइन आरक्षण सारख्या सुविधा द्यावी. सार्वजनिक वाहतुकीस अटी व शर्तींचा आधारे परवानगी देण्यात आलेली आहे.---नियम असे- जिल्ह्यात रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई- वरील वेळेत चित्रपटगृह, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट बंद राहतील मात्र घरपोच सेवा सुरू राहील.- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी- लग्न कार्यासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई---अन्यथा संस्थात्मक केंद्रात रवानगीबाधीत व्यक्तीचे घरातच अलगीकरण केल्यास दाराच्या दर्शनी भागात गृहअलगीकरणााचा फलक व व्यक्तीच्या हातावर शिक्का मारावा. या नियमाचे उल्लंघन झाल्यास व्यक्तीची तात्काळ त्याची रवानगी संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी केली जाईल. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनी शक्यतो बाहेर न पडावे, तसेच मास्कचा वापर करावा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर