इचलकरंजी : शहरातील एका जुन्या नावाजलेल्या टेलरच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. गांधी पुतळा परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाने लावलेल्या लेसर किरणांमुळे या टेलरच्या डोळ्याला इजा झाल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.दरम्यान, लेसरच्या वापरावर बंदी घातली असताना केवळ आकर्षणासाठी मिरवणुकीत बेकायदा लेसर वापरल्याने त्याचा परिणाम सामान्यांना भोगावा लागत आहे. मिरवणुकीत लावलेल्या लेसरमुळे टेलरच्या डोळ्याला धुसर दिसू लागले. रात्रभर उपचार उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्याची पूर्णपणे दृष्टी गेली. त्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू झाले. पाचहून अधिक तज्ज्ञांना दाखवून तब्बल ५० हजारांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. सध्या बंगळुरूतील तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून, पुन्हा दृष्टी येण्यासाठी सहा महिने लागतील, असा अंदाज आहे.
Kolhapur: मिरवणुकीतील 'लेसर'मुळे एकाच्या डोळ्याला गंभीर इजा, इचलकरंजीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:10 IST