कोल्हापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटांतील एक लाख १६ हजार १२४ मुलांना, तसेच अंगणवाडी, तसेच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या पटावरील सर्व विद्यार्थ्यांना व शाळेत न जाणाऱ्या मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेमार्फत आज, मंगळवारपासून दि. २७ सप्टेबर अखेर राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील
या सप्ताहानंतर मंगळवार दि. २८ सप्टेबर रोजी मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे.
कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात. ती मुले अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. शाळेतही अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो, म्हणून भारताची भावी पिढी सुदृढ व सशक्त होण्याकरिता जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या नजीकच्या महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन, आपल्या १ ते १९ वर्षापर्यंतच्या सर्व पाल्यांस जंतनाशकाचा डोस द्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.