शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

१२ वर्षांच्या मतभेदांचे ग्रहण सुटणार कधी ? शाहू जन्मस्थळाचे एक कोटी परत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:55 IST

राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्ती करणारे समाधी स्मारक अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले; पण महाराज जन्मले त्या शाहू जन्मस्थळाचा वनवास गेली १२ वर्षे संपलेला नाही. ज्या महाराजांनी जनतेचा उद्घार केला, त्या लोकराजाचा जिथे जन्म झाला त्या वास्तूचा विकास केवळ इतिहासकालीन वास्तूंचे ज्ञान नसल्याने आणि मतभेदांमुळे रखडला आहे.

ठळक मुद्दे वस्तुसंग्रहालयाचे काम थांबले :

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे काम पुन्हा ठप्प झाल्याने वस्तुसंग्रहालयासाठी आलेला एक कोटीचा निधी आता परत जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात संग्रहालयासाठी मंजूर झालेल्या दोन कोटींपैकी एक कोटीचा निधी २०१९-२० या आर्थिक वर्षात संपविणे गरजेचे होते. मात्र वस्तुसंग्रहालयाचे कामच थांबविल्याने मार्चअखेर हा निधी शासनाला परत जाईल. मतभेदांमुळे आणखी किती वर्षे हा प्रकल्प रखडणार आहे, त्यावर पर्याय काही काढूया का, यावर कोणीच बोलायला तयार नाही.

राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्ती करणारे समाधी स्मारक अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले; पण महाराज जन्मले त्या शाहू जन्मस्थळाचा वनवास गेली १२ वर्षे संपलेला नाही. ज्या महाराजांनी जनतेचा उद्घार केला, त्या लोकराजाचा जिथे जन्म झाला त्या वास्तूचा विकास केवळ इतिहासकालीन वास्तूंचे ज्ञान नसल्याने आणि मतभेदांमुळे रखडला आहे. जन्मस्थळासाठी शासन निधीची कमतरता पडू देत नाही; तरीही या वास्तूचा विकास होत नाही, ही शोकांतिका आहे. पहिल्या टप्प्यात कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसच्या चार इमारतींचे नूतनीकरण पूर्ण होऊन चार वर्षे झाली. तिथे दुसºया टप्प्यातील वस्तुसंग्रहालय आकाराला आलेले नाही.

शासन पुरातत्त्व खात्याला काम करू देत नाही, ठेका देण्याची पद्धत आॅनलाईन आहे, ती जुन्या ठेकेदारालाच मान्य झाली, समितीच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराला असे संग्रहालय साकारायचे ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना हा ठेकेदार नको आहे; पण शासकीय प्रक्रियेनुसार काम सुरू झाले. मात्र दोन महिन्यांपूर्वी खासदार संभाजीराजे यांनी जन्मस्थळामध्ये बैठक घेतली, त्यावेळी तज्ज्ञ समितीने आम्हाला ठेकेदार मान्य नसल्याचे सांगितले आणि खासदारांनी काम थांबविण्याचे आदेश दिले.

राजर्षी शाहू महाराजांचे काम आहे; त्यामुळे शासनाने नियमांना मुरड घालून खात्यालाच हे काम करू द्यावे, असा समितीचा आग्रह आहे. शासन त्याला तयार नाही. या मतभेदांत संग्रहालयाचे काम मात्र अनिश्चित काळासाठी रखडले आहे.

जन्मस्थळ दृष्टिक्षेपात

  • इतिहास संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २००७ मध्ये शाहू जन्मस्थळ प्रकाशात. विकास करण्याची मागणी
  • चुकीच्या पद्धतीने वास्तूच्या  चारही इमारतींचे नूतनीकरण;

 

यामुळे वादाची ठिणगी

  • इमारतींचे स्ट्रक्टर बदलण्याची इतिहासतज्ज्ञांची मागणी
  • रडतखडत २०१४ साली वास्तूच्या चार इमारती पूर्ण
  • वस्तुसंग्रहालय साकारण्यासाठी इतिहास संशोधक व तज्ज्ञांची समिती नियुक्त.
  • संग्रहालय साकारण्यासाठी मिळेना ठेकेदार. तीनवेळा निविदा प्रक्रिया
  • पुरातत्त्व खात्यानेच वस्तुसंग्रहालय साकारण्याचा प्रस्ताव,

शासनाकडून नकार

  • खुली निविदा प्रक्रिया : तज्ज्ञांच्या दृष्टीने ‘ब्लॅक लिस्ट’ असलेल्या ठेकेदारालाच निविदा मंजूर
  • तज्ज्ञ समितीचा ठेकेदाराला विरोध, नोव्हेंबरमध्ये काम बंद.

दुसरा टप्पा १३ कोटींचावस्तुसंग्रहालयाचा दुसरा टप्पा १३ कोटी ४२ लाखांचा असून त्यासाठी दोन कोटी मंजूर झाले, त्यापैकी एक कोटीचा निधी पुरातत्त्व खात्याकडे वर्ग झाला. ठेका दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. डिस्प्ले, छायाचित्रांचे संवर्धन, फ्रेमिंगची कामे पूर्ण. चित्रकार, शिल्पकारांना काम व त्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कमही देण्यात आली. त्यात दोन चित्रकार व एका शिल्पकाराचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती