रंकाळा तलावाच्या पदपथ उद्यानात निर्माण करण्यात आलेल्या रोबोटिक थीमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते व आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी झाले, त्यावेळी ते बोलत होते.
शहरातील बागबगीचे, रंकाळा, कळंबा पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची करमणूक झाली पाहिजे, त्यांना तशा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सरकार आमचे आहे. त्यामुळे महापालिकेने सतत विकासकामांचे प्रस्ताव तयार करून द्यावेत, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
जलसंपदाची जागा ताब्यात घेऊ -
देवकर पेट्रोल पंपासमोर असलेली जलसंपदा विभागाची जागा आहे. ती महानगरपालिकेने ताब्यात घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन मंत्र्यांकडून चार कोटी आणणार -
रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा चार कोटी ८० लाखांचा प्रस्ताव सात वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता, त्याला मंजुरीही मिळाली. त्यातील फक्त ५० लाख आले; परंतु मागच्या सरकारच्या काळात एक रुपयाही मिळाला नाही, अशी खंत माजी गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. त्यावर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे माझे मित्र आहेत. बाकीचा चार कोटी रुपयांचा निधी आणण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
प्रारंभी राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, वसंतराव देशमुख, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, सचिन पाटील, माधुरी लाड, दीपा मगदूम, रिना कांबळे उपस्थित होते.
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या घोषणा -
- हुतात्मा पार्क, महावीर उद्यानाच्या विकासास दोन कोटी.
- गांधी मैदान विकसित करण्यासाठी एक कोटीचा निधी.
- रंकाळ्या सभोवती ५० लाखांचे एलईडी बल्ब
-पुईखडी येथे चार कोर्टचे राष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट
- कळंबा तलवाच्या काठावर ऑक्सिजन पार्क
- ज्येष्ठ नागरिकांना विनाअडथळा पदपथची निर्मिती
(फोटो - रंकाळा नावाने देत आहे.)