कोल्हापूर : नोकरीवरून घरी परतणा-या महिलेचा भर रस्त्यातच हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्याचा प्रकार जवाहरनगर चौकात शुक्रवारी सायंकाळी घडला. याबाबत शनिवारी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगप्रकरणी एकास अटक केली. विजय दशरथ गजाकोश (वय ३४, रा. २८३२ बी वॉर्ड, जवाहरनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ३८ वर्षीय असून ती खासगी नोकरी करते. शुक्रवारी सायंकाळी त्या नोकरीवरून घरी परतत होत्या, त्यावेळी संशयित विजयने तिचा पाठलाग केला. जवाहरनगर चौकात भर रस्त्यात तिचा हात पकडून तिला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी शनिवारी पीडित महिलेने राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित विजय गजाकोश याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार सायंकाळी त्याला पोलिसांनी अटक केली.