गडहिंग्लज : ३९८ वर्षांनंतर गुरू आणि शनि ग्रहांची दुर्मीळ युती झाली. गडहिंग्लजमधील दीडशे खगोलप्रेमींनी या दुर्मीळ युतीचा अनुभव घेतला. त्यासाठी गडहिंग्लज मराठी विज्ञान परिषदेतर्फे अवकाश दर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील सायन्स सेंटरमध्ये ग्रहांची युती पाहण्यासाठी सोमवारी (दि. २१) सायंकाळी खगोलप्रेमींसह आबालवृद्धांनी व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. ग्रहांची युती पाहण्यासाठी टेलिस्कोपची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
सायंकाळी साडेसहा वाजता ग्रहांच्या युतीला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत या युतीचा काळ होता. एम. डी. यळूरकर यांनी सूर्यमालेविषयी, तर अरुण कुरबेट्टी यांनी ग्रहांच्या युतीविषयी माहिती दिली. गुरूचे चार उपग्रह, शनिच्या कडा, चंद्र, मंगळ व अन्य ग्रह टेलिस्कोपद्वारे दाखविण्यात आले. ''''मविप''''चे संजय घाटगे, एस. के. नेर्ले, कल्याणराव पुजारी, विश्वनाथ धूप, जितेंद्र पाटील, नाना पाटील, अभिलाषा चव्हाण, आदींनी नियोजन केले.
यावेळी सुरेश कोळकी, योगेश शहा, डॉ. श्रीकांत सुतार, डॉ. प्रजित पाटोळे, प्रकाश भोईटे, संतान बारदेस्कर, संजय सोलापुरे, प्रवीण पाटील, दीपक कित्तूरकर, मंजिरी देशपांडे, सुनंदा नेर्ले, आदी उपस्थित होते.