शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जुना बुधवारात दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Updated: October 12, 2014 01:06 IST

दहाजणांना अटक : महिलेसह नगरसेवक गंभीर जखमी

कोल्हापूर : सोन्यामारुती चौक येथील नीलेश हॉटेलमध्ये जेवणाची ताटे उशिरा दिल्याच्या कारणावरून दोन गटांतील वादावादीचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये स्वीकृत नगरसेवक शशिकांत धोंडिराम पाटील (वय ४०, रा. सोन्यामारुती चौक, जुना बुधवार पेठ), त्यांची भावजय सुनंदा पाटील व दुसऱ्या गटातील प्रवीण सुतार हे गंभीर जखमी झाले. हल्ल्यामध्ये दगड, काठ्या व तलवारी यांचा वापर करण्यात आला. या धुमश्चक्रीमुळे परिसरात गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून दोन्ही गटांचे कार्यकर्ते पसार झाले. ही हाणामारी निवडणुकीच्या वादातून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. याबाबत पोलिसांनी सांगितले, नगरसेवक शशिकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, नीलेश हॉटेलमध्ये आपल्या घरातील मुले जेवणासाठी गेली असताना तेथे आॅर्डर दिलेली जेवणाची ताटे लवकर दिली नाहीत म्हणून हॉटेलमालक सुहास भालकर यांच्याशी किरकोळ वाद झाला. हा वाद मिटवून घरी गेल्यानंतर हॉटेलमालक भालकर यांच्या बाजूने भगतसिंग तरुण मंडळाचे उदय भोसले, करण भोसले, अभिमन्यू भोसले, रोहित पाटील (आप्पा), विजय खोत, प्रवीण सुतार, मकरंद ऊर्फ पिंटू स्वामी अशा २० ते २५ जणांनी घरात घुसून मारहाण केली. यामध्ये माझ्यासह भावजय सुनंदा पाटील जखमी झाल्या; तर विरोधी गटाच्या अभिमन्यू उदय भोसले (२१, रा. सी वॉर्ड, जुना बुधवार पेठ) याने दिलेल्या फिर्यादीमध्ये बापू फें्रडस सर्कल या ठिकाणी भांडण मिटविण्यासाठी वडील उदय, भाऊ करण भोसले, मित्र विजय खोत, प्रतीक शिर्के, रोहित पाटील, पिंटू स्वामी, प्रवीण सुतार, विकी सुतार उभे असताना शशिकांत धोंडिराम पाटील, महेश चंद्रकांत पाटील, अमित शिवाजी दुधगावकर, सागर नारायण पाटील, हरीश शिवाजी दुधगावकर, प्रथमेश चंद्रकांत जाधव, युवराज चंद्रकांत दाभाडे, अशा २० ते २५ जणांनी एकत्र जमून दगडफेक करून प्रवीण सुतार याच्यावर सूर्यकांत पाटील याने तलवारीने हल्ला केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले. त्यानंतर रात्री उशिरा फिर्यादी दाखल करून संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.