शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच योजना नव्या स्वरूपात, महापालिका अंदाजपत्रक सादर : कोणतीही करवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 14:07 IST

कोणतीही करवाढ नसलेले, कोणतीही नावीन्यपूर्ण योजना नसलेले आणि सुरू असलेल्या जुन्याच योजनांच्या पूर्ततेवर जोर देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी स्थायी समितीला सादर केले. अंदाजपत्रकातील तरतुदी पाहता महापालिका प्रशासनाच्या आर्थिक मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अंदाजपत्रकातील तब्बल ४७ टक्के खर्च हा कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि मानधन देण्यावरच खर्च होणार आहे.

ठळक मुद्देजुन्याच योजना नव्या स्वरूपातमहापालिका अंदाजपत्रक सादर : कोणतीही करवाढ नाही

कोल्हापूर : कोणतीही करवाढ नसलेले, कोणतीही नावीन्यपूर्ण योजना नसलेले आणि सुरू असलेल्या जुन्याच योजनांच्या पूर्ततेवर जोर देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी स्थायी समितीला सादर केले. अंदाजपत्रकातील तरतुदी पाहता महापालिका प्रशासनाच्या आर्थिक मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अंदाजपत्रकातील तब्बल ४७ टक्के खर्च हा कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि मानधन देण्यावरच खर्च होणार आहे.गेल्या काही वर्षांत राज्य सरकारकडून महापालिकेवर झालेली अवकृपा, महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेता कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्यापलिकडे प्रशासन फारसे काही ठोस काम करू शकलेले नाही. शिवाय सुरू असलेल्याच योजना नवीन अंदाजपत्रकात नव्याने मांडून त्याच्या पूर्ततेला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळते.सेफ सिटी प्रकल्प टप्पा २ आणि केशवराव भोसले नाट्यगृह परिसर टप्पा २ ही कामे तर सलग तिसऱ्या वर्षी अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही कामे ना महापालिका करू शकले, ना राज्य सरकार निधी देऊ शकले आहे. तरीही ती अंदाजपत्रकात धरण्यात आली आहेत. थेट पाईपलाईन, दुधाळी एसटीपी, अमृत अभियानांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पदेखील मागील पानावरून पुढे घेण्यात आले आहेत.महापालिकेच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिलकेसह महसुली व भांडवली अपेक्षित जमा ७३५ कोटी ७६ लाख धरण्यात आली असून, खर्च ७२५ कोटी ३८ लाख अपेक्षित आहे. विशेष प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचे जमाखर्च स्वतंत्र अंदाज केले असून, त्यामध्ये जमा ५४३ कोटी २४ लाख, तर खर्च ५१३ कोटी ६६ लाख रुपये दाखविण्यात आला आहे.

वित्त आयोगांतर्गत १०७ कोटी ९५ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले असून, खर्च १०२ कोटी ९५ लाख दाखविण्यात आला आहे. महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प, वित्त आयोग असे सर्व मिळून १३८६ कोटी इतका जमेचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला आहे. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर