शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जुनीच पेन्शन’ पाहिजे: नवीन पेन्शन बेभरवशाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:03 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन पाहिजे आहे; कारण ही पेन्शन सुरक्षित असून, संपूर्ण कुटुंबालाही लाभदायी आहे. त्याउलट नवीन पेन्शन योजना ही बेभरवशाची आहे; त्यामुळे जुनीच पेन्शन द्यावी, अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे; त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे.

ठळक मुद्दे‘जुनीच पेन्शन’ पाहिजे: नवीन पेन्शन बेभरवशाची : सरकारी कर्मचाऱ्यांची भावना : लढा सुरूच

प्रवीण देसाईकोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन पाहिजे आहे; कारण ही पेन्शन सुरक्षित असून, संपूर्ण कुटुंबालाही लाभदायी आहे. त्याउलट नवीन पेन्शन योजना ही बेभरवशाची आहे; त्यामुळे जुनीच पेन्शन द्यावी, अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे; त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे.राज्य शासनाच्या ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार पाच नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) लागू केली; त्यामुळे राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या म्हणजेच जुन्या कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशदायीकरण व जुन्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना याच्या तरतुदी शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ ला किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या १0 टक्के इतके मासिक अंशदान द्यावे लागेल. या रकमेएवढेच शासन अंशदान देईल. या योजनेखाली जमणाऱ्या निधीचे व्यवस्थापन व विनिमय करण्यासाठी एक स्वतंत्र विकास प्राधिकरणाची स्थापना सरकारने केली आहे.

एकंदरीत या पेन्शन योजनेवरच कर्मचाऱ्यांचा भरवसाच राहिलेला नाही. यात गुतंवलेल्या निधीची सुरक्षितता कर्मचाऱ्यांना वाटत नाही, तसेच २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, फॅमिली पेन्शन नाही, प्रॉव्हिडंड फंड नाही, कर्मचारी मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील कोणालाच नोकरीची हमी नाही; त्यामुळे पेन्शनला विरोध करत गेल्या १४ वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली आहे.

जिल्'ातील १५ हजार कर्मचारी नवीन पेन्शनवालेजिल्'ातील सुमारे १५ हजार सरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ नंतरची नवीन पेन्शन योजना लागू आहे, तर ४२ हजार कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीची जुनी पेन्शन लागू आहे.

जुन्या पेन्शनचे फायदे१) जुन्या पेन्शनसाठी सर्व पैसे शासन भरते.२) कर्मचारी मृत झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना ‘फॅमिली पेन्शन’चा लाभ.

जुनीच पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. नवीन पेन्शन योजना बेभरवशाची असून, ती कर्मचाऱ्यांना मंजूर नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून याविरोधात आंदोलन सुरू आहे. जुन्या पेन्शनसाठी इथून पुढेही लढा सुरूच राहील.- अनिल लवेकर, निमंत्रक,शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर