शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

बंदोबस्तावरील जवानांचा रंगला कौतुक सोहळा जुना बुधवार पेठेने व्यक्त केली कृतज्ञता : पुष्पगुच्छ आणि कोल्हापुरी भगवा फेटा प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:45 AM

कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला.

कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला.पंधरा दिवस ज्या जवानांनी डोळ्यात तेल घालून याठिकाणी बंदोबस्त केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय परिसरातील माजी नगरसेवक धनंजय सावंत, तालमीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, रणजित पाटील, संजय पाटील, सुनील शिंदे, रमेश गवळी सुशील भांदिगरे आदींनी घेतला. त्यानुसार तालमीच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व जवानांना रात्री कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद देऊन पाहुणचार केला.यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील उपस्थित होते.यावेळी प्रशांत अमृतकर म्हणाले,आम्ही पोलिस रात्री घरी जाऊ शकतो. कुटुंबात थोडा वेळ देऊ शकतो. पण हजारो किलो मीटर अंतरावरुन येऊन राज्य पोलिस दलाचे कर्मचारी बंदोबस्त करतात.त्यांचा कामाची दखल जुना बुधवार तालीमने घेतली. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.दरम्यान,तालमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी राज्य राखीव जवानांनी अनेक तणावाच्या ठिकाणी आम्ही काम केले.यावेळी काम करताना आमच्यावर ताण येत होता. मात्र, तालमीच्या परिसरात पहिल्या दिवसापासून नागरिकांनी सहकार्य केले, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासो मोरे, प्रताप उर्फ बापू घोरपडे, दिलीप गवळी, दिलीप दिंडे, रमेश पुरेकर,आनंदा वरेकर, सुशांत महाडिक, किसन पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.कोरेगांव-भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन जानेवारीला कोल्हापूर बंद होते. दिवसभर झालेल्या तणावामुळे राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी बोलविण्यात आली होती. त्यानंतर जुना बुधवार तालीमकडून सिद्धार्थनगरकडे जाणाºया रस्त्यावर जवानांचा बंदोबस्त होता. पण जुना बुधवार पेठ आणि सिद्धार्थनगरातील भावनिक नात्यामुळे तीन तारखेच्या घटनेनंतर कोणताही वाद झाला नाही. तरीही जुना बुधवार पेठ व सिद्धार्थनगरातील लोकांना राज्य राखीव पोलिस दलाचा आधार होता. हळूहळू परिसरातील लोकांचा या जवानांबरोबर परिचय होऊ लागला. नागरिक त्यांना चहा पाणी, नाष्टा देऊ लागले व वातारवरण निवळू लागले.संक्रातीच्या सणाला महिलांनी भोगीला बाजरीची भाकरी, संक्रांतीला पोळ्याचे जेवण दिले. तिळगुळ देऊन काहींनी आभार मानले. नागरिकांच्या आपुलकीमुळे पोलिस भारावले.कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळाने बंदोबस्तासाठी सिद्धार्थनगर येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा सत्कार बुधवारी पुष्पगुच्छ देऊन भगवा फेटा बांधून करण्यात आला. याप्रसंगी शहर पोलीस उपअधीक्षकडॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह जवान उपस्थित होते.