ते सोळांकूर (ता. राधानगरी) येथे व्यंकनाथ उद्योग व शिक्षण समूहातर्फे गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
पाटील म्हणाले छ. शाहू महाराजांनी आपल्या अल्प कारकिर्दीत जे अलौकिक कार्य केले, ते सर्वांनाच सतत प्रेरणा देत राहिले आहे. तसेच त्यांना सन्मानित करत होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते.
यावेळी पंचायत समिती राधानगरीचे कनिष्ठ अभियंता संतोष पाटील यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामसेवक नितीन पाटील यांनी स्वागत केले. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुकुंद पानारी, पार्वती कुंभार, विद्या लोहार, वैशाली तोरस्कर, विमल निचिते, राजाराम कांबळे, सुरेश जाधव, अनिल जाधव ,सुधाकर कुंभार, अजित पाटील उपस्थित होते. नितीन नारकर यांनी आभार मानले.