शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या भत्त्यापासून अजूनही अधिकारी, कर्मचारी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:00 IST

लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळालेला नसताना विधानसभेचा भत्ता तरी मिळतो की नाही, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या भत्त्यापासून अजूनही अधिकारी, कर्मचारी वंचितनिवडणुकीच्या काळात भत्त्यावरून निवडणूक विभागासोबत वाद

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळालेला नसताना विधानसभेचा भत्ता तरी मिळतो की नाही, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला भारत निवडणूक आयोगाकडून कामकाज भत्ता दिला जातो; परंतु ही निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप अधिकारी व कर्मचाऱ्यांना भत्ता मिळाला नसल्याचे चित्र आहे. यातील मतदान व मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भत्ता देण्यात आला आहे, असा दावा जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आला आहे; परंतु याव्यतिरिक्त महिनाभर केलेल्या कामाचा भत्ता मिळाला नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.निवडणुकीच्या काळात भत्त्यावरून शिक्षकांनीही निवडणूक विभागासोबत वाद घातला होता. आता विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून लोकसभा निवडणुकीतीलच बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचा भत्ता अजून मिळालेला नाही. आता विधानसभेचा भत्ता तरी वेळेवर मिळणार काय, असा सवाल या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजातील मतदान व मतमोजणीचे भत्ते संबंधितांना अदा केले आहेत. फक्त अतिकालिक भत्ता हा दिलेला नाही; कारण यासाठी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरून माहिती जिल्हा निवडणूक विभागाला अद्याप आलेली नाही. ही माहिती आल्यानंतरच याबाबतचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवून भत्त्यासाठी निधीची मंजुरी घेता येऊ शकते.- सतीश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर