शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कार्यालये, जिल्हा परिषदेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:22 AM

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाºया एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक ...

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाºया एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांना मतदानाच्या दुसºया दिवशी अधिकृत सुट्टी असल्याने अनेक विभागांची कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ५५0 कर्मचारी कार्यरत आहेत. यातील सुमारे ५00 कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामाचे आदेश होते. वरिष्ठ १६ अधिकाºयांपैकी १0 हून अधिक अधिकाºयांवरही निवडणुकीची जबाबदारी दिली होती; त्यामुळे अनेक प्रमुख अधिकारी आणि बहुतांशी कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाºयांना घरी जाण्यासाठी पहाटेचे पाच वाजल्याने आता हे सर्व कर्मचारी गुरुवारीच कामावर येणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अध्यक्षा शौमिका महाडिक आणि अन्य पदाधिकारी अपवादानेच जिल्हा परिषदेत आले होते. आता ही सर्व मंडळी आजपासून जिल्हा परिषदेत दिसतील.जिल्हा परिषद अध्यक्ष दालनाशेजारी गटनेता अरुण इंगवले आणि पक्षप्रतोद विजय भोजेयांचे दालन आहे. सर्वपक्षीय अनेकजण याच दालनात बसून असतात; परंतु गेल्या महिनाभरामध्ये या दालनामध्ये फारसे कुणी न आल्याने येथे नेहमी कडी घातलेली असते. आज, बुधवारी मात्र विजय भोजे, विनय पाटील, सातपुते, प्रवीण यादव, मनोज फराकटे हे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांच्या दालनामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत बसल्याचे पाहावयास मिळाले.अधिकारीही हतबलमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते; मात्र अन्य कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनाही फारसे काम करता आले नाही. गुरुवारनंतरच या कामाला गती येणार आहे.