शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नूतन नगरसेवक विधानपरिषदेच्या बहुमोल मताला चुकणार

By admin | Updated: November 9, 2016 01:15 IST

२०८ नगरसेवक : विधानपरिषदेपूर्वी संपणार नगरसेवकांची मुदत

समीर देशपांडे -- कोल्हापूर -जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे २0८ नूतन नगरसेवक २0२१ सालच्या विधान परिषदेच्या निवडणूक मतदानाला मुकणार आहेत. २0२१ सालची विधान परिषद जाहीर होण्याआधी या निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपणार असल्याने त्यांना हा मतदानाचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे साहजिकच या बहु‘मोल’ मतदानापासून या २0८ जणांना वंचित राहावे लागणार आहे. २00९ च्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डिसेंबर २0१५ मध्ये पार पडली. आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील हा संघर्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेला आला होता. या निवडणुकीआधी सतेज पाटील यांनी पाच वर्षांपूर्वीच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पायाला भिंगरी बांधून आगामी विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले होते. त्या बळावरच २२0 मते मिळवित महादेवराव महाडिक यांच्यापेक्षा ६३ मते अधिक घेऊन पाटील यांनी बाजी मारली होती. या पार्श्वभूमीवर २0२१ साली होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास २८ नोव्हेंबरला निवडून येणारे कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे २0८ नगरसेवक आणि ९ नगराध्यक्ष यांची मुदत आधी संपत असल्याने या निवडणुकीत ते मतदान करू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधान परिषदेची निवडणूक ही डिसेंबर २0२१ साली होणार आहे. तर आता निवडून येणाऱ्या नगरसेवकांची मुदत नोव्हेंबर २0२१ सालीच संपणार आहे. विधान परिषदेच्या आमदारांचा कालावधी सहा वर्षांचा, तर नगरसेवकांचा कालावधी पाच वर्षांचा याचा हा परिणाम आहे. विधान परिषद निवडणूक होऊन दहा महिने झाले असले तरी निवडणूक आयोग जी मतदार यादी तयार करेल त्या यादीत या नगरसेवकांची नावे असण्याची शक्यता नाही. अमूल्य मताची संधी जाणारविधान परिषदेची निवडणूक म्हटल्यानंतर कुणी किती घेतले याची चर्चा नंतर महिनाभर सुरू असते. पाटील-महाडिक यांच्यातील अटीतटीच्या लढतीत तर आकडे ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. यातील खरे खोटे किती? हा मुद्दा वेगळा असला तरी लाखो रुपये खर्चून नगरसेवक होणाऱ्यांना विधान परिषदेचे मतदान करता येणार नसल्याची मोठी रुखरुख लागून राहणार, हे नक्की.२00९ साली विधान परिषदेची जी निवडणूक झाली, त्यावेळीही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या नगरसेवकांना मतदानाची संधी नव्हती. मात्र, २0१५च्या निवडणुकीत मात्र हे नगरसेवक मतदानासाठी पात्र होते. आता पुन्हा २00९ ची पुनरावृत्ती होणार असून, येणाऱ्या विधान परिषदेसाठी या नगरसेवकांना मतदानाची संधी असणार नाही. - आमदार सतेज पाटीलनगरपालिका व नगरसेवक संख्या१. इचलकरंजी६२२. जयसिंगपूर२४३. कागल२0४. वडगाव१७५. गडहिंग्लज१७६. कुरूंदवाड१७७. मुरगुड१७८. मलकापूर१७९. पन्हाळा१७एकूण २0८हा तर ‘जर तर’चा विषययाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करता, हा ‘जर तर’ चा विषय असून, त्यावेळी निवडणूक आयोग कोणत्या तारखेपासून मतदारांची यादी गृहित धरणार आहेत, त्यावरच हा विषय अवलंबून असेल, असे मत व्यक्त केले.