शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

‘जीवनदायी’ रुग्णालयांची संख्या वाढणार

By admin | Updated: July 27, 2016 00:34 IST

राजीव गांधी आरोग्य योजना : लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ : दीडशेहून अधिक रुग्णालयांचे अर्ज

गणेश शिंदे --कोल्हापूर --राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत लाभार्थ्यांची (रुग्ण) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रुग्णालयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी ३४ रुग्णालयांची प्रक्रिया आजअखेर पूर्ण झाली असून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीकडून सात रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या ३० वरून आणखी वाढणार आहे. रुग्णालयांची संख्या वाढल्याने ठरावीक रुग्णालयांची मक्तेदारी मोडण्यास मदत होणार आहे. राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने प्रथम जुलै २०१२ मध्ये आठ जिल्ह्यांत तर २० नोव्हेंबर २०१३ ला उर्वरित जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास अडीच वर्षांत लाभार्थ्यांची संख्या कमालीची वाढली असून राज्यात पहिल्या तीनमध्ये जिल्ह्याची कामगिरी आहे. यापूर्वी ३२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट होती. दोन महिन्यांपूर्वी या योजनेतील करार, अटी व शर्र्थींचा भंग केल्याप्रकरणी दोन रुग्णालयांना ‘बाहेरचा रस्ता’ दाखविण्यात आला. त्यामुळे ती ३० झाली आहे पण, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रुग्णालयांनी योजनेत समाविष्ट होण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यासाठी त्या रुग्णालयाचे दिल्लीतील नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड आॅफ हॉस्पिटल (एनएबीएच) मानांकन असणे गरजेचे आहे. त्यापैकी ३४ रुग्णालयांची प्रक्रिया पूर्ण झाली असून सात रुग्णालयांची तपासणी केली आहे. रुग्णालयांची संख्या वाढल्याने साहजिकच त्याचा फायदा रुग्णांना होणार असल्याने या योजनेत काही ठरावीक रुग्णालयांची असणारी मक्तेदारी मोडण्यास मदत होणार आहे. ‘अशी राहते प्रक्रिया...राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व एम. डी. इंडियाचे प्रमुख स्वत: रुग्णालयांत जाऊन तपासणी करतात. रुग्णांना ज्या मूलभूत सेवा व सुविधा आहेत. त्या रुग्णालयात प्राप्त आहेत का ? याची खातरजमा करतात. ही समिती याचा अहवाल योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय सचिव, एम. डी. इंडियाचे अधिकारी व नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एनआयसी)चे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सादर करतात. जिल्हालाभार्थी रुग्ण खर्च १) अहमदनगर१८ हजार ११९५३ कोटी १४ लाख ३९ हजार १७२ रुपये२) औरंगाबाद२१ हजार ४९०५३ कोटी तीन लाख ५९ हजार ४५० रुपये३) कोल्हापूर१७ हजार २०२४८ कोटी ७३ लाख २६ हजार ९५ रुपये४) मुंबई व उपनगर१५ हजार ३३४७ कोटी ६५ लाख ३५ हजार १६० रुपये ५) नाशिक१८ हजार ३७३४६ कोटी ७७ लाख ५७ हजार ८४२ रुपयेया योजनेत सुमारे ११०० आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याने ही योजना सामान्य माणसाला आधार वाटत आहे. लाभार्थ्यांची संख्या पाहता नवीन रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. -डॉ.अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.