शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

आता कुठे आयुष्याची घडी बसत होती, पण...

By admin | Updated: August 27, 2015 00:30 IST

कंटनेर अपघाताचा फटका : मिठारी कुटुंबीयांना मानसिक धक्का; उपचारासाठी लाखांचा खर्च अपेक्षित

प्रदीप शिंदे - कोल्हापूर म्हैसपालनातून मिळणाऱ्या दुधाच्या व्यवसायावरच घराचा डोलारा उभा होता. याला हातभार म्हणून राहुलने सहा महिन्यांपूर्वीच जुनी रिक्षा घेतली. सकाळी रिक्षा व रात्री ताराबाई रोडवर भजी-पावच्या गाडीवर कामाला जाऊन राहुल घरच्यांना हातभार लावू लागला. कष्टांमुळे आता कुठे घडी बसत असताना, शाहूपुरीतील ब्रेक फेल झालेल्या कंटेनरच्या अपघाताने मिठारी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. राहुलवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठीचा खर्च लाखोंच्या घरात असल्याने हे कुटुंब विवंचनेत सापडले आहे.संभाजीनगर येथे राहणाऱ्या मिठारी कुटुंबीयांचा पारंपरिक दूध व्यवसाय आहे. वडिलांचे वय झाल्याने राहुल एकमेव कमावता आहे. हातभार लागावा म्हणून तो खासगी नोकरी करीत होता. सहा महिन्यांपूर्वी येथील नोकरी सुटल्याने तो रिक्षा व्यवसाय करीत होता. दररोज सकाळी रिक्षा काढायची व सायंकाळी सातनंतर ताराबाई रोडवरील भजी-पावच्या गाडीवर कामावर जात असे. त्याच्या अशा दिवस-रात्र कष्टांमुळे घरची परिस्थिती जरा कुठे सुधारत होती. नेहमीप्रमाणेच मंगळवारी राहुलने सकाळी रिक्षा काढली. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सोडून शाहूपुरी येथील वामन गेस्ट हाऊसच्या दारात चहा पिण्यासाठी रिक्षा थांबविली. रिक्षा बंद करून बाहेर पडतो तोवर पाठीमागून जोरात रिक्षाचा बार खांद्यावर आदळला. काही समजण्याच्या आतच तो फरफटत गेला. यावेळी पायाला जोरात मुका मार लागल्याने जिवाच्या आकांताने तो ओरडत होता. पुढे तसाच जोरात फरफटत जाऊन रिक्षामध्ये अडकून पडला. यावेळी त्याला बाहेरचे काहीच दिसत नव्हते. नुसता लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. काय झाले समजत नव्हते. कोणीतरी ‘ड्रायव्हरला बोलवा. गाडीखाली एकजण अडकला आहे,’ असे जोरात ओरडत होते. यावेळी वेदना खूप होत होत्या. कोणीतरी ड्रायव्हरला आणले व कंटेनर मागे घेतल्यानंतर लोकांनी त्याला बाहेर काढून सीपीआरमध्ये उपचारांसाठी आणले. ही घटना सांगताना आजही राहुलच्या मनातील भीती प्रखरपणे जाणवत होती. राहुलला अपघात झाला आहे, असे वडिलांना कोणीतरी फोन करून सांगताच त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. ते आपल्या काही नातेवाइकांसोबत ‘सीपीआर’मध्ये आले. राहुलला पाहून ते या ठिकाणी प्रत्येकाला विचारत होते, ‘राहुल ठीक होईल ना?...’ त्यांच्या या प्रश्नाने कुणाला काय बोलावे समजत नव्हते. नातेवाईक व मित्रमंडळींनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती आता सुधारत असून, कमरेखाली इजा झाल्याने त्याच्यावर बुधवारी सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुलला एक लहान भाऊ आहे, तर आई गृहिणी आहेत. अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्याच्या बंदीच्या नियमांची अंमलबजावणी प्रशासनाने जर काटेकोरपणे केली असती तर मिठारी कुटुंबीयांवर ही वेळ आज आली नसती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बुधवारी रेल्वेचे अधिकारी राहुलची भेट घेऊन गेले असले तरी आर्थिक मदत मिळेलच, हे नक्की सांगता येत नाही. राहुल घरातील कमावती व्यक्ती कमरेखाली मोठी दुखापतबुधवारी खासगी रुग्णालयात झाली शस्त्रक्रियारेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली राहुलची भेट; उपचारांसाठी आर्थिक मदत मिळेल काय हा प्रश्नच.