शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आता चहा पिऊन झाल्यावर कप खावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

एडिबल कटलरी निर्मितीची संकल्पना मॅकेनिकल इंजिनिअर दिग्विजय यांना सुचली. त्यावर याबाबतची माहिती त्यांनी ऑनलाईन शोधली. त्यातून हैदराबाद, गुजरातमध्ये उत्पादित ...

एडिबल कटलरी निर्मितीची संकल्पना मॅकेनिकल इंजिनिअर दिग्विजय यांना सुचली. त्यावर याबाबतची माहिती त्यांनी ऑनलाईन शोधली. त्यातून हैदराबाद, गुजरातमध्ये उत्पादित होणारे खाण्यायोग्य चमचे, कप त्यांनी मागविले. त्याचा दीड वर्षे अभ्यास केला. त्यातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत खाण्यायोग्य कप निर्मितीचा निर्णय त्यांनी घेतला. लॉकडाऊनच्या कालावधीत हैदराबादमधून या कप निर्मितीसाठीचे मशीन बनवून घेतले. त्यानंतर मित्र आदेश (सिव्हीअल इंजिनिअर), राजेश (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांच्या साथीने त्यांनी बिस्कीट कपची निर्मिती जानेवारीपासून सुरू केली आहे. सध्या शहरातील काही कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये या बिस्कीट कपचा ते पुरवठा करीत आहेत. पुढील टप्प्यात वडापाव, पिझ्झा, आदींसाठीच्या प्लेटस्, बाऊल्स आदींची निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

चौकट

‘झिरो वेस्ट’ तत्त्वावर निर्मिती

मॅग्नेट एडिबल कटलरी या ब्रँडच्या माध्यमातून या बिस्कीट कपची निर्मिती आम्ही केली आहे. त्यासाठी मित्र सिद्धार्थ बुधवंत, युवराज राऊत यांचीही मोठी मदत झाली. पालकमंत्री सतेज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, विजय सूर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस यांचे सहकार्य लाभले. मैदा, साखर, कॉर्न फ्लॉवर, इसेंस, आदींच्या वापरातून झिरो वेस्ट तत्त्वावर तयार केलेला हा कप एक महिन्यापर्यंत वापरता येतो. त्याची किंमत अडीच रुपये आहे. चहा, कॉफी, आदी पेय घेतल्यानंतर हा कप चवीने खाऊ शकतो. कचरा म्हणून टाकल्यास त्यामुळे पर्यावरणाला धोका होत नसल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.

चौकट

स्वत: मशीन निर्मिती करणार

परवडणाऱ्या दरात आणि मोठ्या प्रमाणात या बिस्कीट कपचे उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कप निर्मितीचे तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे मशीन बनविण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. त्याचा आराखडा तयार झाला असून येत्या चार महिन्यांमध्ये हे मशीन बाजारपेठेत आम्ही उपलब्ध करून देणार असल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.

फोटो (०८०२२०२१-कोल-बिस्कीट कप ०१, ०२) : कोल्हापुरातील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे यांनी राजेश खामकर यांच्या मदतीने पर्यावरणपूरक बिस्कीट कपची निर्मिती केली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)