शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

आता ‘कॅशियर’ लेस बॅकिंग

By admin | Updated: December 5, 2014 00:24 IST

‘किओस्की’ची सुविधा : जलद पैसे भरण्यासाठी बँकांत मशीनपुढे रांगा...!

रमेश पाटील - कसबा बावडा -बँकेत पैसे भरायचे आहेत. गर्दी तर प्रचंड आहे. रांगेत थांबायला वेळ नाही; परंतु आता अशी वेळ ग्राहकांवर येणार नाही. कारण आता बँकांनी ‘कॅश डिपॉझिट किओस्की’ (पैसे स्वीकारणारे मशिन्स) ठिकठिकाणी बसविण्यास सुरुवात केली आहे. हे मशीन कमी वेळेत जलद पैसे स्वीकारून त्याची त्वरित रिसीट देते. शिवाय खात्यावरही त्वरित पैसे जमा करते. तसेच तुमचा रांगेत उभा राहण्याचा वेळही वाचवते. सध्या शहरातील काही मोठ्या निवडक बँकांत ही सुविधा सुरू झाली आहे. कोल्हापुरातही काही बँकांत ही सुविधा आहे.बँकांनी आपल्या ग्राहकांना ‘एटीएम’ वापरण्याची सक्ती केल्याने बँकांतून चेक अथवा विड्रॉल्सद्वारे पैसे काढणाऱ्यांची संख्या कमी झाली. मात्र, खात्यावर पैसे भरणाऱ्यांची संख्या पूर्वी आहे तशीच किंवा त्याहून जास्त अशीच राहिली आहे. या पैसे भरण्यासाठी गर्दी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी प्रमाणात व्हावी, तसेच त्यांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांना रांगेत उभा राहता लागू नये यासाठी ‘किओस्की’ मशीन बसविण्यात येऊ लागल्या आहेत. सुरुवातीला गोंधळून गेलेले ग्राहक आता नित्य नियमाने या मशीनचाच वापर करू लागले आहेत. या मशीनमुळे भविष्यात कॅशियरचे महत्त्व कमी होण्यााची चिन्हे आहेत. किओस्क मशिन वापरण्यास सोपे आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेंपैकी एक भाषा निवडून आपणास ते वापरता येते. एका व्यक्तीला एका दिवशी आपल्या खात्यावर ४० हजार रुपये भरता येतात. त्यापेक्षा जास्त रक्कम हे मशीन स्वीकारू शकत नाही. तसेच एकावेळी कोणत्याही प्रकारच्या केवळ ४० नोटाच हे मशीन स्वीकारते. बनावट नोटा हे मशीन चटकन ओळखते. त्या नोटा बाहेर काढते.या मशीनमध्ये पाच लाखांपर्यंत नोटा साठविण्याची क्षमता आहे. ज्याठिकाणी ‘ई-गॅलरी’ आहे, अशा ठिकाणी मात्र नोटा साठविण्याची क्षमता १५ लाखांपर्यंत आहे. बँकांचा कॅश टाईम संपेल तेव्हा या मशीनमधील रक्कम काढून घेतली जाते. एखाद्यावेळी मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जादा रक्कम साठली, तर त्याचा संदेश संबंधित यंत्रणेला आपोआपच दिला जातो.सध्या कोल्हापूर शहरात आठ ते दहा ठिकाणी अशा मशीन बसविण्यात आल्या आहेत. कमी वेळेत आणि जलद पैसे भरून या मशीनद्वारे घेतले जात असल्यामुळे मशीनमध्येच पैसे भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बँकेस कॅशियरच्यासमोर जशी पैसे भरण्यासाठी गर्दी होते, तशीच गर्दी आता या ‘किओस्की’ मशीनच्या पुढे होऊ लागली आहे. त्यामुळे बँकांनी आता एटीएम मशीनप्रमाणे या ‘किओस्की’ मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्राहकांतून होऊ लागली आहे.‘किओस्की’ची संख्या वाढणारसध्या कॅश डिपॉझिट किओस्कीमध्ये पैसे भरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भविष्यात अशा किओस्कींची संख्या वाढविण्यात बँका निश्चितच भर देणार आहेत. एटीएम सेंटरप्रमाणे किओस्कीची सेंटरही काही दिवसांनी सर्वत्र दिसतील.विनयकुमार मिश्रा,वरिष्ठ प्रबंधक (आय. टी.), बँक आॅफ इंडिया.