शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आता प्रबोधन पुरे; थेट कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सव काळात डॉल्बीबाबत केलेल्या प्रबोधनाकडे व सूचनांकडे डोळेझाक करुन ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर थेट कारवाई करा, अशा कडक सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकाºयांच्या बैठकीत दिल्या.कसबा बावडा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिस अधिकाºयांची बैठक आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सव काळात डॉल्बीबाबत केलेल्या प्रबोधनाकडे व सूचनांकडे डोळेझाक करुन ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर थेट कारवाई करा, अशा कडक सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकाºयांच्या बैठकीत दिल्या.कसबा बावडा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिस अधिकाºयांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.सातत्याने डॉल्बीबाबत पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थाही डॉल्बीच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करीत आहेत. मात्र याकडे डोळेझाक करणाºयांचे आता प्रबोधन नाही, त्यांच्यावर थेट कारवाई करा, असे नांगरे -पाटील यांनी सांगितले.संजय मोहिते म्हणाले, पुढील आठवड्यात गणेशोत्सव आहे. याच काळात ईद हा सण आला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. यंदाच्या गणेशोत्सवात आजरा, चंदगड व गडहिंग्लज हे तीन तालुके डॉल्बीमुक्त झाले आहेत. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्तीचा निर्धार केला आहे. कसबा बावडा येथे झालेल्या मंडळांच्या बैठकीत तीन गणेश तरुण मंडळांनी डॉल्बी लावणार नसल्याचे पत्र शाहूपुरी पोलिसांना दिले आहे; तर गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून जिल्ह्यात ३७० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जादा अधिकारी व कर्मचाºयांची मागणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक पोलीस उपअधीक्षक, पाच अधिकारी व ४३० कर्मचाºयांची मागणी तसेच १००० गृहरक्षक (होमगार्ड) मागविण्यात येणार आहे. पोलीस उपअधीक्षक यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाºयांनी गावांना भेटी द्याव्यात, असे मोहिते यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.११ फाळकूटदादा टोळ्या हद्दपारसमाजविघातक कृत्ये करून दहशत माजविणाºया ११ फाळकूटदादांच्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. लवकरच त्यांना हद्दपार करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.