शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

रेशन व्यवस्थेतील काळ्याबाजाराला आता चाप

By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST

‘बायोमेट्रिक’साठी यंत्रणा कामाला : खाबुगिरी होणार बंद, पारदर्शकता येणार

कोल्हापूर : शासनाने रेशन दुकानात बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेमधील काळ्याबाजाराला चाप बसणार आहे. लाभार्थ्याच्या नावावरील धान्यावर दरमहा डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही खाबुगिरी बंद होणार आहे. बायोमेट्रिक बसविण्यासाठी जिल्हा अन्नधान्य वितरण प्रशासन कामाला लागले आहे.संपूर्ण जिल्ह्यात १५६९ रेशन दुकाने आहेत. शासनाकडून दरमहा येणाऱ्या धान्याचे या दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाते. अंत्योदय योजनेतून लाभार्थ्याला दरमहा २० किलो गहू दोन रुपये दराने, तर १५ किलो तांदूळ ३ रुपये दराने दिला जातो. प्राधान्य योजनेतून प्रत्येक व्यक्तीला पाच किलोंप्रमाणे ‘अंत्योदय’च्या दराने धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा सर्वच लाभार्थी रेशनचे धान्य प्रत्येक महिन्याला घेऊन जात नाहीत. परिणामी धान्य शिल्लक राहते. संबंधित धान्य दुकानदार व्यवस्थेतील कर्मचारी,अधिकारी यांना हाताशी धरून कागदोपत्री धान्य घेऊन गेल्याचे दाखवितात. शिल्लक राहिलेले धान्य खुल्या बाजारात विकतात. राजकीय लागेबांधे असल्यामुळे कारवाईही होत नाही. परिणामी अनेक वर्षांपासून गरीब, सर्वसामान्यांसाठी आलेल्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे जगजाहीर आहे. काही दुकानदारांनी तरी लाभार्थ्यांच्या गैरसोयीच्या वेळी दुकान सुरू ठेवून अधिकाधिक धान्य कसे शिल्लक राहील आणि आपल्याला डल्ला कसा मारता येईल यावरच लक्ष केंद्रित केलेले असते. कितीही प्रत्यत्न केले, अधून-मधून कारवाई झाली तरी पूर्णपणे काळ्याबाजाराला चाप बसविण्यात यश येत नव्हते. यामुळे शासनाने शेवटी छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटकच्या धर्तीवर रेशन धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थीचे ‘थंब’ झाल्यानंतरच त्याला धान्य मिळणार आहे. दुकाननिहाय शिल्लक राहिलेल्या धान्याची माहिती नेमकेपणाने मिळणार आहे. त्यात पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय ‘प्राधान्य’ व कंसात ‘अंत्योदय’ लाभार्थी तालुनिहाय असे - कोल्हापूर- २४९८८४ (३२५९), करवीर- ३५८६५५ (१९७१), पन्हाळा- १६२७०५(४६५२), हातकणंगले- २९१३९७ (४९९५) , इचलकरंजी - ११३४८६ (४४७०), शिरोळ- २४७०५३ (४६३८), कागल- १६८५६० (४२२४), शाहूवाडी - १२६४३३ (३४६५) गगनबावडा- १८९०२ (८८३), राधानगरी- १३२७८७ (३९६०), गडहिंग्लज- ११७७३१ (६३५०), आजरा- ७३४४३ (४००९), चंदगड- १०७९१८ (६०६९), भुदरगड- ९८८३९ (३५५७).बायोमेट्रिकमुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. काळाबाजार थांबणार आहे. मात्र अंमलबजावणी काटेकोर होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाचा बायोमेट्रिकचा निर्णय स्वागतार्ह आहे.- चंद्रकात यादव, ‘रेशन बचाव’चे नेतेदुकानांची संख्या अशी सहकारी संस्था८३७वैयक्तिक४५३महिला बचत गट २१७ ग्रामपंचायत४७माजी सैनिक५पुरुष बचत गट१अनुसूचित जाती१इतर८