शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील गैरप्रकारांवर आता ‘अ‍ॅप’द्वारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:53 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणुकीतील गैरप्रकारांवर नजर ठेवून ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हीजील’ अ‍ॅपची निर्मिती ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निवडणुकीतील गैरप्रकारांवर नजर ठेवून ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हीजील’ अ‍ॅपची निर्मिती केली आहे. त्याचा वापर प्रथमच येत्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. या अ‍ॅपमध्ये माहिती भरण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. मतदारांसाठी नववर्षातील ही ‘गुड न्यूज’ आहे. या अ‍ॅपमुळे गल्ली बोळात होणाऱ्या पैसे वाटपापासून जेवणावळी, आचारसंहितेचा भंग, आदींची माहिती कोणत्याही नागरिकाकडून फोटो काढून अपलोड केल्यास निवडणूक विभागाकडून कारवाई होणार आहे.या लोकसभा निवडणुकीत प्रथमच याचा वापर होणार आहे. या संदर्भात नुकतेच आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागांना निर्देश देण्यात आले असून, यामध्ये मतदान केंद्रनिहाय सर्व माहिती भरण्यास सांगितले आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडून जिआॅग्रॉफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) मॅपिंगद्वारे सर्व मतदान केंद्रांची इत्थंभूत माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.शासनाच्या इतर विभागांत नागरिकांना आपली तक्रार देण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये या आॅनलाईन तक्रारीवर पुढील कार्यवाही होते. त्याच धर्तीवर निवडणूक आयोगाने ‘लाईव्ह पोर्टल’ असलेल्या या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप मोबाईल फोनवरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून निवडणूक काळात गल्लीबोळात सुरू असलेले पैसे वाटण्याचे प्रकार, जेवणावळी, आचारसंहिता भंगचे प्रकार मोबाईलवरून फोटो काढून ते अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर ही माहिती सहजरीत्या जिल्हा निवडणूक विभागाकडे जाणार असून, त्यानंतर तेथून संबंधित भाग किंवा मतदान केंद्र ज्यांच्या अखत्यारीत येतो, त्या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविले जाईल. त्यानंतर ते संबंधितांवर तातडीने कारवाई करतील, अशा पद्धतीने या अ‍ॅपची रचना आहे.विशेष म्हणजे तक्रार करणाºया व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.