शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘अ‍ॅडमिशन’चे नो टेन्शन...!

By admin | Updated: March 22, 2015 00:36 IST

‘लोकमत’चे मिशन अ‍ॅडमिशन गुरुवारपासून : एकाच छताखाली सर्व उपलब्ध

कोल्हापूर : कोल्हापुरातील कोणती इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली आहे, प्रवेश कधी सुरूहोणार, प्रवेश शुल्क किती असणार यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आता तुम्हाला दारोदार फिरण्याची गरजच नाही. कारण ही सर्व माहिती तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध झाली तर..! होय, तसेच होणार आहे. कारण त्यासाठीच ‘लोकमत’ने मिशन अ‍ॅडमिशन हे आगळेवेगळे प्रदर्शन घेतले असून, गुरुवार (दि. २६ मार्च)पासून तीन दिवस ते सुरू राहणार आहे. कमला कॉलेजजवळच्या व्ही. टी. पाटील सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, त्याची पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मिशन अ‍ॅडमिशन’ - समर कॅम्प एक्स्पो २०१५ या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील नामवंत स्कूलची माहिती मिळू शकेल. त्यामुळे या शाळांत फिरण्यासाठी होणारी धावपळ टाळता येऊ शकेल. तुमच्या मुलांस कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्या शाळेत नेमक्या काय सोयीसुविधा आहेत, त्यांचा ‘फी’चा पॅटर्न कसा आहे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ती शाळा नेमके काय प्रयत्न करते, यापासून शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहितीही तुम्हाला या प्रदर्शनात मिळू शकेलच, शिवाय त्या शाळेच्या प्रतिनिधींशी तुम्हाला समोरासमोर बसून चर्चाही करता येऊ शकेल. सर्वच शाळांची माहिती व फी यासंबंधीची माहिती मिळाल्यास तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी उत्तम शाळेचा पर्याय निवडण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. शाळांनाही कमीतकमी खर्चामध्ये एकाचवेळी अनेक पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकेल. या प्रदर्शनामध्ये शाळा, कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अबॅकस, अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट, आर्ट अँड क्राफ्ट, करिअर मार्गदर्शन, सर्व प्रकारचे स्पोर्टस् कोचिंग क्लासेस, नृत्य, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, संगीत वाद्ये, स्मरणशक्ती, योगासन, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश कोर्सेस, बुद्ध्यांक मूल्यमापन मार्गदर्शनापासून ते मुलांचा आहार चांगला कसा असावा यासंबंधीचेही ‘डायट प्लॅनिंग’ करून देणाऱ्या स्टॉलपर्यंतची सगळी माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंबंधीच्या संस्था या प्रदर्शनात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व स्टॉल बुकिंगसाठी राहुल- ९९२२९४४००१, सचिन- ९७६७२६४८८५ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)