शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

फेरतपासणी न करणाऱ्या बसमालकांना नोटिसा

By admin | Updated: June 17, 2016 00:30 IST

‘आरटीओ’ची कारवाई : शाळा बस वाहतूक प्रश्न; न आल्यास परवाना रद्द करणार

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्कूल बसेसची फेरतपासणी मुदतीत न केलेल्या कोल्हापुरातील २८२ बस परवानाधारकांना गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ‘आपला परवाना रद्द का करू नये’ अशा नोटिसा बजावल्या. सात दिवसांत नोटिसीला उत्तर न दिल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. उच्च न्यायालयात स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता जनहित याचिका दाखल झाली होती. यात स्कूल बसची सुटीच्या कालावधीत फेरतपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने परिवहन आयुक्तांना दिले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांतील स्कूल बस परवानाधारकांना आपल्या बस फेरतपासणीकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात आणाव्यात म्हणून वैयक्तिक नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यात दोनवेळा तपासणीकरिता मुदतवाढ देऊनही अनेक परवानाधारकांनी याकडे कानाडोळा केला. बुधवारी (दि. १५) संपलेल्या दुसऱ्या मुदतीत ५०७ पैकी २२५ परवानाधारकांनी बसेसची फेरतपासणी केली. यात किरकोळ दुरुस्ती व सूचना करीत या बसेस तपासणीत उत्तीर्णही करण्यात आल्या; पण उर्वरित २८२ परवानाधारकांनी या तपासणीला ठेंगा दाखविला. इचलकरंजी येथे दोन वेळेस, तर गडहिंग्लज व कोल्हापूर कार्यालयात रविवारी सुटीच्या दिवशीही विशेष शिबिराचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर विषय असूनही या बस परवानाधारकांनी त्याकडे पाठ फिरविल्याने प्रथम शिक्षणाधिकारी व त्यानंतर शिक्षण उपसंचालकांद्वारे त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंतीपत्रेही पाठविली. त्यानुसार २२५ जणांनी आपल्या बस तपासून घेतल्या. उर्वरित बस परवानाधारकांनी पाठ फिरविली. म्हणून फेरतपासणी न केलेल्या परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. विद्यार्थी वाहतुकीचा गंभीर प्रश्न असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरतपासणी करणे ही स्कूल बस परवानाधारकांसाठी आवश्यक बाब होती. ज्यांनी तपासणी केली नाही, अशा परवानाधारकांना नोटीस बजावण्यात येईल. तरीही ते तपासणीकरिता आले नाहीत तर त्यांचा परवाना निलंबित केला जाईल.- रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर