शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या बड्या थकबाकीदारांना लिलावाच्या नोटिसा, नावे झळकणार होर्डिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:05 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच्या प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती  देण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या बड्या थकबाकीदारांना लिलावाच्या नोटिसासंस्थांसह संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढण्याचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच्या प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती  देण्यात आली.जिल्हा बँकेच्या २३ जुलैला झालेल्या औद्योगिक समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर बँक प्रशासनाने थकबाकीदार संस्थांच्या बाबतीत ठोस पावले उचलली आहेत.

३१ मार्च २०१८ अखेर थकबाकीदार असलेल्या या संस्थांमध्ये शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ, राधानगरी तालुका सहकारी मका प्रक्रिया (स्टार्च) संस्था मर्यादित (ठिकपुर्ली), विजयमाला बाबूराव देसाई सहकारी वाहतूक संस्था मर्यादित (मडीलगे बुद्रुक), शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्यादित (हेरवाड), भोगावती शेतकरी सहकारी कुक्कुटपालन संस्था मर्यादित (परिते), हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्यादित (निलजी), महाराष्ट्र स्टेट को-आॅप. टोबॅको फेडरेशन(मार्केट यार्ड), मयूर सहकारी वाहतूक संघ मर्यादित (कोल्हापूर), पंत सहकारी वस्त्रोद्योग प्रोसेस संस्था लिमिटेड (तिळवणी), श्री. एस. के. पाटील सहकारी बँक लिमिटेड (कुरुंदवाड) या बड्या थकबाकीदार संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती या देण्यात आली आहे.

थकबाकीदारांची नावे झळकणार होर्डिंगवरया कारवाईचा पहिला टप्पा म्हणून बँकेतर्फे या बडया थकबाकीदार संस्थांची नावे व थकीत रकमेसह याद्यांचे होर्डिंग्ज बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर, तसेच थकबाकीदार संस्थांसह संचालकांच्या दारात लावले जाणार आहेत.

तसेच यासंबंधीचे निवेदनही वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध केले जाणार आहे. या मानहानीला बँक जबाबदार असणार नाही. बँकेने यापूर्वी राबविलेल्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेत (ओटीएस) सहभाग घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी कळवूनही प्रतिसाद न मिळाल्याने या नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

थकबाकी भरा अन कटू प्रसंग टाळाअजूनही वेळ गेलेली नाही. थकबाकी सत्वर भरून कटू प्रसंग टाळावा. संस्थेच्या वसुलीबाबत ‘ओटीएस’ योजना चालू असून, त्याचा लाभ घ्यावा. तरीही दोन आठवड्यात आपणाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यास अतिशय नाईलाजास्तव लिलाव प्रक्रियेची कठोर पावले उचलावी लागतील, असा निर्वाणीचा इशारा बॅँक प्रशासनाने नोटिसीद्वारे दिला आहे. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर