शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जैववैद्यकीय कचराप्रकरणी महापालिकेला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:01 IST

जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देजैववैद्यकीय कचराप्रकरणी महापालिकेला नोटीसप्रदूषण मंडळाची कारवाई : कचरा हाताळण्यात हलगर्जी

कोल्हापूर : जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, लाईन बाजार येथील महापालिकेच्या जैववैद्यकीय कचरा प्रकल्प स्थळावर जैववैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावर घातक प्रकारे साठवलेले आढळून आले आहे.

पावसाचे दिवस असल्याने जैववैद्यकीय कचऱ्यावर पाणी पडत असल्याने त्याचं लीचेट होण्याची शक्यता आहे. जे वादळाच्या पाण्याने सुविधेच्या परिसराच्या बाहेरच्या भागाकडे जाऊ शकते. ज्यामुळे विषाणूच्या प्रसार होण्याचा धोका आहे.''प्रदूषण मंडळा''ने उपस्थित केलेले प्रश्न

  • जैववैद्यकीय कचरा साठवणूक, वाहतूक व हाताळणी बाबतच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.
  • प्रकल्पातील कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली नाहीत.
  • जैववैद्यकीय कचरा ज्या वाहनातून मुंबई येथे पाठवला याबाबत कोणत्याही नोंदी आढळून आलेल्या नाहीत.
  • जैव वैद्यकीय कचरा नियमांचे पालन आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास गंभीर नाही.
  • सुविधेचा चुकीचा वापर करून मानवी आरोग्यावर आणि आसपासच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

सात दिवसात खुलासा करण्याचे आदेशपर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई का सुरू केली जाऊ नये. याबाबत सात दिवसात खुलासा देण्यात यावा असेही प्रदूषणाने म्हटले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर