शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

मुद्रा योजनेंतर्गत कर्ज पुरवण्याच्या बँकांना सूचना

By admin | Updated: October 2, 2015 01:13 IST

प्रांताधिकारी कार्यालयात निर्णय : नागरिकांशीही सौजन्याने वागण्याचे आमदारांची व्यवस्थापकांना विनंती

इचलकरंजी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांनी सुलभरित्या कर्ज वाटप करावे. त्याचबरोबर नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व बॅँकांच्या व्यवस्थापकांना केल्या. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व शिखर बॅँकेचे सरव्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी उपस्थित होते.प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत शिशू योजना, किशोर योजना व तरुण योजना या माध्यमांतून लघुउद्योजकांना कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. येथील भाजपच्यावतीने याबाबत जनजागृती केली असून, त्यानुसार सर्व बॅँकांमध्ये व्यवसायासाठी कर्ज काढण्यासाठी तरुण जातात. मात्र, तेथे व्यवस्थित माहिती दिली जात नाही. तसेच कर्जपुरवठाही केला जात नाही, अशा अनेक तक्रारी आमदार हाळवणकरांकडे आल्या. त्यानुसार या कर्ज पुरवठ्यामध्ये बॅँकांना कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे व कर्जपुरवठा सुरळीत करणे यासाठी गुरूवारी ही बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, पुढील महिन्यात या योजनेसाठी इचलकरंजीत विशेष मोहीम म्हणून कर्ज पुरवठा करण्यासाठी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी मुद्रा योजनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विनोद कांकाणी, भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, आदींसह शहर परिसरातील सर्व नॅशनल बॅकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. (वार्ताहर)बॅँकांना बंधनकारकसर्व बॅँकांना ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज साठ टक्के, पाच लाखापर्यंतचे वीस टक्के व दहा लाखापर्यंतचे वीस टक्के कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. संपूर्ण देशात या योजनेसाठी सरकारने १२२ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र, आजतागायत फक्त २५ हजार कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. बॅँकांच्या उदासिनतेमुळेच हे घडले आहे.काम लागणार असल्याने उदासीनताइचलकरंजीत प्रांत कार्यालयात गुरूवारी झालेल्या बैठकीमध्येही येथील बॅँकांचे सर्व प्रतिनिधी उदासीनतेच्या अवस्थेत दिसत होते. प्रांताधिकारी जिरंगे व आमदार हाळवणकर यांनी सूचना दिल्या. मात्र, त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद न देता आता पुन्हा नवीन काम लागणार, अशा उदासिनतेच्या भूमिकेत अधिकारी दिसले.