शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माती उत्खननप्रकरणी ७६ शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: June 24, 2017 00:11 IST

वीट व्यावसायिकांमध्ये खळबळ : चिंचवाडमधील शेतकरी एकत्रित लढणार

लोकमत न्यूज नेटवर्क --उदगाव : शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील उदगाव, चिंचवाडमध्ये तब्बल ३३ हजार ब्रास बेकायदेशीर माती उत्खनन झाल्यानंतर अखेर तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. या नोटिसांमुळे वीटभट्टी व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सरासरी ८ ते १५ लाखांपर्यंत दंड ठोठावण्याची शक्यता असून, याबाबत सात दिवसांत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे म्हणणे मांडण्याबाबतची नोटीस शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. उदगाव, चिंचवाड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून वीट व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे कृष्णाकाठ हा पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असून, कृष्णा नदीकाठ बचावासाठी अनेक नागरिकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्रालय, लोकायुक्त यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये लोकायुक्त यांनी बेकायदेशीरपणे ३३ हजार ब्रास माती उत्खनन झाल्याचे स्पष्ट करून संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून चिंचवाडमधील ३२ व उदगावमधील ४४ शेतकऱ्यांना बेकायदेशीर माती उत्खनन केल्याप्रश्नी सात दिवसांत म्हणणे मांडण्याबाबतच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी रितसर रॉयल्टी भरून माती उत्खनन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणी न करता मातीचे उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने माती नेमकी किती ब्रास काढण्यात आली, याचा अंदाज शेतकऱ्यांना आला नाही. त्यामुळे वीट व्यावसायिकांनी प्रत्येक गटात सरासरी १०० ते २ हजार ब्रास मातीचे उत्खनन बेकायदेशीरपणे केले आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींनंतर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व गट नंबरचा पंचनामा करण्याचा आदेश दिला होता. यानंतर प्रत्येक गटात असा एकूण ३३ हजार ब्रास मातीचे उत्खनन बेकायदेशीरपणे झाल्याचे समोर आले होते. याबाबत मुंबई येथे लोकायुक्त यांच्या सुनावणीमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ कायद्यानुसार अनधिकृतपणे माती उत्खनन केलेल्या मातीची बाजार भावाने होणाऱ्या रकमेच्या पाचपट दंड वसुलीचा आदेश दिला आहे. रक्कम न भरल्यास शेतकऱ्यांच्या सात/बारा उताऱ्यावर रक्कम चढवून गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. वीट व्यावसायिकांमुळे शेतकरी अडचणीतउदगाव, चिंचवाड परिसरातील बाहेर गावातील वीट व्यावसायिकांनी मातीचे उत्खनन करून वीट व्यवसाय थाटला आहे. मात्र, ह्या व्यावसायिकांनी शासनाला कमी रॉयल्टी भरून जादा मातीचे उत्खनन केले आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांवर लादला जात आहे. जादा मातीचे उत्खनन होत असताना कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी यावेळी काय करीत होते? असा सवाल शेतकरी करीत असून, सर्व शेतकरी एकत्रित येऊन याबाबत तहसीलदारांपुढे म्हणणे मांडणार आहेत.कोट्यवधींची रक्कमचिंचवाड येथील शरद चव्हाण यांच्या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी शेतकऱ्यांकडून दंड वसुलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३३ ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन झाले असून, यात उदगाव व चिंचवाडमधील ७६ शेतकऱ्यांना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. दंडाची पाचपट रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला असून, ती सहा कोटींच्या घरात जाते. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, व्यावसायिकांनी मात्र काढता पाय घेतला आहे.