कोल्हापूर : पतीचे निधन झालेल्यांनी विधवा शब्द वापरू नका. पती असताना ती अर्धांगिनी आणि वारल्यावर पूर्णांगिनी असते, त्यामुळे या महिलांनी स्वत:ला पुर्णांगिनी समजावे, असे मत वाचा तज्ज्ञ शिल्पा हुजूरबाजार यांनी व्यक्त केले.
स्वयंसिद्धा संस्थेचे सुहासिनी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी कोरोनाने पतीचे निधन झालेल्या पाच महिलांना जीवनाेपयोगी साहित्य भेट देण्यात आले. हुुजूरबाजार म्हणाल्या, जीवन हा मोक्षपट आहे. यात नवरा जिंकून मोक्षाला गेला. त्यामुळे महिलांनी रडत न बसता यापुढेही आनंदी राहावे.
सौम्या तिरोडकर, तृप्ती पुरेकर, जयश्री गायकवाड यांनी संयोजन केले. शीतल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
--
फोटो नं १००९२०२१-कोल-स्वयंसिद्धा
ओळ : कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेत झालेल्या कार्यक्रमात शिल्पा हुजूरबाजार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
---