शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

उत्तर प्रदेश नव्हे, प्रश्न प्रदेश

By admin | Updated: August 17, 2014 22:35 IST

राम नाईक : राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

कोल्हापूर : श्रीराम-कृष्णांची जन्मभूमी, सुफी संत व गौतम बुद्धांची कर्मभूमी व यमुना-गंगेचे पवित्र खोरे अशी उत्तर प्रदेशची असणारी ओळख पुसली जात आहे. जातीय दंगली, भ्रष्टाचार, खून, बलात्कार यांचे प्रमाण उत्तर प्रदेशात वाढत आहे. तो उत्तर प्रदेश नव्हे, प्रश्न प्रदेश बनला आहे. राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिप्रादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिेषदेत केले.उत्तर प्रदेशासारखी परिस्थिती देशात इतरही राज्यांत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. नाईक म्हणाले, उत्तर प्रदेशात तब्बल २४ विश्वविद्यालये आहेत; मात्र गेल्या चार वर्षांत एकाही विद्यापीठातील दीक्षांत समारंभ झालेला नाही. कल्पनेशी अतिशय विसंगत अशीच परिस्थिती सध्या उत्तरप्रदेशात आहे. येथील घटनांचे गांभीर्य मोठे आहे, तरीही केंद्र व राज्य यांच्यात कोणताही संघर्ष न होता, घटनात्मक चौकटीत राहून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर विशेष भर राहील. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी प्रत्येक घटनेबाबत चर्चा करून केंद्राशी समन्वय सुरू आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरी असल्याचा अभिमानकोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. मी कोल्हापुरी असल्याचा मला अभिमान आहे . - राम नाईक, राज्यपाल उत्तर प्रदेश.कुष्ठरोग्यांसाठी मुंबई महापालिकेने दोन हजार रुपये मासिक मानधन देण्याचे योजले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर महापालिकेने ेयेथील २५० ते ३०० च्या संख्येने असलेल्या कुष्ठरोगी कुटुंबीयांना मासिक मानधन द्यावे. शहरातील मोठे उद्योजक व दानशूर व्यक्तींंनी कुष्ठरोग्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, त्यांच्यासाठी मदतीची भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्यपाल नाईक यांनी केले.लक्ष्मणरेषा पाळलीराम नाईक यानी राजकीय प्रश्नांना खुबीने बगल दिली. येळ्ळूर येथे मराठी भाषिकांना झालेल्या मारहाणीबाबत दु:ख व्यक्त करीत अधिक बोलणेही टाळले. उत्तर प्रदेशातील दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका, राज्यात मुख्यमंत्रिपदाची शर्यत, आदी प्रश्नांना बगल देत, ‘मला लक्ष्मणरेषा पाळावीच लागेल’ असे स्पष्ट केले.