शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘दिलबहार’च्या सामन्यात ‘पंचगिरी’ नाही -कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 01:27 IST

पंचांच्या निर्णयामुळे जर दिलबहार तालीम मंडळ संघाचा पराभव व हुल्लडबाजी होत असेल, तर या संघाच्या यापुढील कोणत्याही सामन्यांत ‘पंचगिरी’ न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सॉकर रेफ्री असोसिएशनने

ठळक मुद्देशशांक माने याच्यावर कडक कारवाई करा

कोल्हापूर : पंचांच्या निर्णयामुळे जर दिलबहार तालीम मंडळ संघाचा पराभव व हुल्लडबाजी होत असेल, तर या संघाच्या यापुढील कोणत्याही सामन्यांत ‘पंचगिरी’ न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सॉकर रेफ्री असोसिएशनने घेतला. याबाबत छत्रपती शाहू स्टेडियमवरील के.एस.ए.च्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय एकमुखी घेण्यात आला.

दिलबहार-पाटाकडील तालीम यांच्यात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी (दि. २४) झालेल्या अंतिम सामन्यानंतर पंच रूममध्ये येऊन दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा नोंदणीकृत खेळाडू शशांक माने याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींनी रूमच्या दरवाजावर लाथा मारल्या. यासह सहपंच अजिंक्य गुजर यांना शिवीगाळ करीत भिंतीवरील आरसा घेऊन त्यांना डोक्यात मारहाण केली. इतर पंचांनी हल्लेखोरांना रोखून धरल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

ही घटना फुटबॉलला काळिमा फासणारी आहे. आम्ही सर्व पंच या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. यातील नोंदणीकृत खेळाडू शशांक माने याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी. याबाबत एका दैनिकात ‘दिलबहार’च्या जबाबदार नेत्याने रेफ्रींच्या निर्णयामुळे संघावर पराभवाची नामुष्की आली, असे वक्तव्य केले आहे. जर या संघाला रेफ्रींच्या निर्णयामुळे पराभव व हुल्लडबाजी होते, असे वाटत असेल तर यापुढे ‘दिलबहार’च्या कोणत्याही सामन्यात पंच म्हणून आमचे पंच उपलब्ध होणार नाहीत, असा निर्णयही सर्वांनुमते घेण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सचिव प्रदीप साळोखे, सहसचिव राजेंद्र राऊत, सूर्यदीप माने, अभिजित गायकवाड, सुनील पोवार, सोमनाथ वाघमारे, राहुल तिवले, गौरव माने, श्रेयस मोरे, गजानन मनगुतकर, योगेश हिरेमठ, शहाजी शिंदे, अजिंक्य गुजर, सतीश शिंदे, हर्षल राऊत, आदी उपस्थित होते. पोलिसांनी १६ कॅमेऱ्यांतील फुटेज ताब्यात घेऊन दोषींवर कारवाई सुरू केली आहे; तर ‘के. एस. ए.’कडूनही चंद्रकांत चषक स्पर्धेच्या संयोजकांनी स्पर्धेसाठी केलेली मैदानाच्या मागणीचा अर्ज, त्यात सहभागी होणाऱ्या संघांची नावे व त्यातील खेळाडू, पंच, सुरक्षारक्षक, संयोजन समितीची माहिती, अंतिम सामन्यातील दोन्ही संघांतील राखीव खेळाडू, आदी माहिती मागविली.दिलबहार ‘ब’ संघाचा नोंदणीकृत खेळाडू शशांक माने याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींनी रूमच्या दरवाजावर लाथा मारल्या. यासह सहपंच अजिंक्य गुजर यांना शिवीगाळ करीत आरसा घेऊन डोक्यात मारहाण केली.शाहू स्टेडियमवरील के. एस. ए. कार्यालयात मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनच्या बैठकीत सचिव प्रदीप साळोखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, राजू राऊत उपस्थित होते.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर