शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

मदार निवासींवरच, पण रुबाब वरिष्ठ डॉक्टरांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:51 IST

अपुरी यंत्रसामग्री आणि अल्प निधीमुळे सीपीआर व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार करताना मर्यादा पडत असल्या, तरी रुग्णालयातील उपचारांची खरी मदार ही निवासी वैद्यकीय

ठळक मुद्देरक्ततपासणीचे खडे बोल : रुग्णसेवेत दिवसरात्र; रुग्णांच्या नातेवाइकांचा रोषही त्यांच्यावरच

तानाजी पोवार ।कोल्हापूर : अपुरी यंत्रसामग्री आणि अल्प निधीमुळे सीपीआर व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार करताना मर्यादा पडत असल्या, तरी रुग्णालयातील उपचारांची खरी मदार ही निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच अवलंबून आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच बहुतांशी उपचार केले जातात अन् रुबाब मात्र नेहमीच काहीवेळापुरते येणाºया वरिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांचा राहिला आहे.

दिवसभरात हजारो रुग्णांची उपचारासाठी सीपीआरमध्ये ये-जो असते. येथे रुग्णांच्या नातेवाइकांना थेट निवासी डॉक्टरांनाच तोंड द्यावे लागते. मेडिसीन विभागात, आर्थो विभागात रुग्णांची नेहमीच वर्दळ असते; तर सर्पदंश झालेल्या सुमारे ३० ते ४० टक्के रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे लागते. अशावेळी निवासी वैद्यकीय अधिकाºयांची भूमिका महत्त्वाची मानली जाते; कारण यावेळी वैद्यकीय अधिकारी जाग्यावर उपलब्ध होत नाहीत.

‘सीपीआर’मध्ये दाखल रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या करणे अत्यावश्यकच असतात. त्या तपासण्या ‘सीपीआर’च्या लॅबमध्ये होत नाहीत. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी मोठमोठे विचार मांडताना रुग्णालयात सर्वच रक्ताच्या तपासण्या येथे केल्या जातात, असे सांगतात; पण ज्या रक्ताच्या तपासण्या येथे होत नाहीत, त्या बाहेरून करण्यास भाग पाडले, तर याच निवासी वैद्यकीय अधिकाºयांना वरिष्ठ अधिकाºयांचे खडे बोल खावे लागतात; पण या तपासण्या करण्याशिवाय गत्यंतरही नसते.थायरॉईड, इलेक्ट्रोलाईटस्, युरिक अ‍ॅसिड, ट्रॉप्टी, कॅल्सियम, फॉस्फरस, अल्कलाईन फॉस्फेट, एचडीएल, एलडीएल, सीपके-एमबी, एबीजी, मायग्लोबीन या रक्ताच्या तपासण्या ‘सीपीआर’मध्ये होत नाहीत.वरिष्ठ आहेत, पण विभाग रिकामाच‘सीपीआर’मध्ये प्रत्येक वरिष्ठ विभागात एक विभागप्रमुख, एक असिस्टंट, एक लेक्चरर अशी वरिष्ठ पदे आहेत; पण हे तीनही वरिष्ठ अधिकारी एकमेकांवर कामे सोपवितात, प्रत्यक्षात या तिन्हीही विभागाचे कोणीही जाग्यावर दिसत नाहीत.हल्ला हा निवासी डॉक्टरांवरच!प्रत्येक विभागात वरिष्ठ अधिकारी कधी थांबतच नसल्याने जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकाºयांवर येते; त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांच्या प्रत्येक रोषाला हे निवासी डॉक्टरच सामोरे जातात; त्यामुळे हल्लाही यांच्यावरच होता. सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांची हजेरी लागते.देखावाचसर्जरी विभाग आणि मेडिसीन विभागाचे प्रमुख हे अनेकवेळा उपस्थित असतात; पण ते फक्तदेखाव्यासाठीच. ते बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना कधीही तपासत नाहीत. त्यांनी शस्त्रक्रिया केली तर ती क्वचितच एखाद्या रुग्णाची, अशी स्थिती असताना त्यावर वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.‘सीपीआर’मधील पदांची संख्यासंवर्ग मंजूर भरलेली पदेवर्ग १ ३३ २वर्ग २ ४४ ४०लिपिक २८ २६तांत्रिक ८४ ६२नर्सिंग ५६२ ५३०वर्ग ४ ३१८ १८९बाह्यरुग्ण नोंदणी : रोज किमान १२००वैद्यकीय अधिकारी संख्या : ४८निवासी वैद्यकीयअधिकारी : ९१कॉटची संख्या : ६५०रोज दाखल रुग्ण : १६० ते १९०

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर