शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तो मृतदेह अजीजचा तर नसेल ना? खात्री डीएनए चाचणीनंतरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:48 IST

मोहन सातपुते ।उचगाव : ‘ती सायंकाळची वेळ आमच्यासाठी काळच बनून आली.४ नोव्हेंबर २०१७ ला अजीज सैफुउद्दीन वजीर (वय ४५, रा. तामगाव) गोकुळ शिरगाव, एमआयडीसी येथील राहत्या घरातून काम बघून येतो, असे सांगून गेले. ते गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत.’ बेपत्ता अजीजविषयी ब ोलताना पत्नी फातिमा डोळ्यांत पाणी आणून सांगू ...

ठळक मुद्दे काळजीने कुटुंबीयांच्या काळजाचे पाणी

मोहन सातपुते ।उचगाव : ‘ती सायंकाळची वेळ आमच्यासाठी काळच बनून आली.४ नोव्हेंबर २०१७ ला अजीज सैफुउद्दीन वजीर (वय ४५, रा. तामगाव) गोकुळ शिरगाव, एमआयडीसी येथील राहत्या घरातून काम बघून येतो, असे सांगून गेले. ते गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत.’ बेपत्ता अजीजविषयी ब ोलताना पत्नी फातिमा डोळ्यांत पाणी आणून सांगू लागली.अजीजच्या वडिलांचा गोकुळ शिरगाव येथे एस. व्ही. इंजिनिअरिंग हा कारखाना आहे. अजीजला वडील नाहीत. आई ७० वर्षांची आहे, तर दोन भावांपैकी एका भावाचे निधन झाले आहे, तर तिसरा भाऊ फॅब्रिकेशनची कामे करतो आणि बहीणही आईचा सांभाळ करीत येथेच राहते. पत्नी फातिमा अजीज वजीर (वय ३६) दोन मुलांसह येथील खासगी कारखान्याच्या पडक्या खोलीत राहत आहे. थोरला मुलगा समध (वय १६) इयत्ता ९ वीमध्ये काडसिद्धेश्वर हायस्कूल येथे शिक्षण घेतो, तर लहान मुलगा मेहबूब (वय ८) विद्यामंदिर तामगाव येथे दुसरीत शिकत आहे.

काही वर्षांपूर्वी अजीजने आपला साडेचार गुंठे प्लॉट व एक गुंठा जमीन तामगाव व नेर्ली येथील एका खासगी मालकाला गहाणवट दिली होती. जसजसे त्याचे पैसे घेतले तसे पैसे परत देतानाही व्याजासह रकमेची मागणी खासगी मालकाने केली होती. तर मध्यस्थी व्यक्तीनेही परस्पर पैसे घेऊन अजीजला फसविले होते. मिरज येथे त्याच्या वडिलांची शेती आहे. त्या संपत्तीची वाटणी करण्याचेही जवळजवळ निश्चित झाले होते. कधीतरी त्यावरून घरी वादविवाद व्हायचे, पण इतक्या टोकाचे नव्हते.

नुकताच तामगाव येथील खणीत हातपाय तारेने बांधलेल्या अवस्थेत एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह गोकुळ शिरगाव पोलिसांना सापडला. त्यानंतर तामगाव परिसरातून कोण व्यक्ती बेपत्ता आहे का? अशी सर्वत्र चर्चा झाली. आपला पती अजीज हा बेपत्ता असल्याने सीपीआर हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी गेले. संबंधित मृताने घातलेल्या कपड्यांची ओळख करताना त्या व्यक्तीच्या खिशात ताईत ठेवण्यासाठी पोपटी रंगाच्या कपड्याचा खिसा आढळला. अजीजच्या अंगातही अगदी सेम अशीच पँट होती. यावरून त्याची कपड्यांबाबतची ओळख झाली आहे; पण मृतदेह नक्की त्याचाच असल्याची खात्री डीएनए चाचणीनंतरच होईल.

कर्ता पुरुष घरातून बेपत्ता झाल्याने आमच्यावर आभाळ कोसळले आहे. त्याच्या बेपत्ता होण्याने संसाराची घडी विस्कटली आहे. कोणी आधार देणारा जवळ नसल्याने भयभीत होऊन कसेतरी दिवस आम्ही ढकलत आहोत. ते कुठं असतील की त्यांचा कोणी घातपात घडवून आणला असेल, याची काळजी लागून राहिली आहे, असेही फातिमा यांनी सांगितले.या जमिनीच्या व ्यवहारानेच घातझाला नाही ना ?अजीज वजीर यांची वडिलोपार्जित साडेचार गुंठे जमीन तामगावला खणीजवळ होती. तर कारखाना परिसरातही जागा होती.या जागा रीतसर खरेदी दिलेल्या नव्हत्या, तर व्याजाने गहाणवट दिल्या होत्या.पैसे आले की सोडवायच्या होत्या, पण ह्या जमिनीपायीच त्यांचा घात झाल्याचा संशय अजीजच्या पत्नी फातिमा यांना आहे.तामगाव (ता. करवीर) येथील अजीज वजीर यांची हीच ती छोटी खोली. तिथं आता बेपत्ता अजीजच्या जाण्याने पत्नी-मुलाचा जीव कासावीस झाला आहे. आपल्या दोन मुलांसह फातिमा वजीर.