शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अशासकीय मंडळ जाणार !

By admin | Updated: November 4, 2014 00:24 IST

बाजार समितीचा ‘बाजार’ : मंडळाविरोधातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या अशासकीय मंडळाचा फैसला चार दिवसांत होणार आहे. याबाबत कृष्णात पोवार व भीमराव पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी, (दि. ७) सुनावणी होणार आहे. ‘नेर’ बाजार समितीबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकाल पाहता नेमलेल्या अशासकीय मंडळाचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. पणन संचालकांनी ७ आॅगस्ट २०१४ ला बाजार समितीचे प्रशासक डॉ. महेश कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली. राजकीय मंडळींनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी अशासकीय मंडळ आणले, पण त्याला जनतेतूनच जोरदार विरोध झाला. कोल्हापूर बाजार समितीसाठी १५ जणांचे जम्बो मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर अशासकीय मंडळाची शेपूट दिवसेंदिवस वाढत जात १९ पर्यंत पोहोचली. त्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झाले. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार व भीमराव पाटील यांनी पणन संचालक यांच्याकडे अशासकीय मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी केली. तोपर्यंत पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लागल्याने गेले दीड महिने या प्रक्रियेत गेले. परिणामी यावरील सुनावणी होऊ शकली नाही. ‘मॅट’चा निकाल व त्यानंतर न्यायालयीन लढाई लढत डॉ. माने हे पणन संचालक म्हणून पुन्हा कार्यरत झाले. पोवार व भीमराव पाटील यांच्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मुळात डॉ. माने यांचा अशा प्रकारच्या अशासकीय मंडळ नियुक्तीला विरोध आहे. त्यामुळे ते या मंडळाला झटका देण्याची शक्यता दाट आहे. त्यात अशासकीय मंडळाविरोधात बाजार समितीचे माजी सभापती बाबगोंड पाटील यांची देखील उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. ‘नेर’ बाजार समिती मधील अशासकीय मंडळाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाची प्रत बाबगोंड पाटील यांनी याचिकेसोबत जोडल्याने अशासकीय मंडळाच्या डोक्यावर बरखास्तीची टांगती तलवार कायम आहे. याची सुनावणी ११ नोव्हेंबरला आहे.( प्रतिनिधी)रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत नरमाई..न्यायालयाने रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही अशासकीय मंडळाने कारवाई केलेली नाही. याविरोधात गेले महिनाभर याचिकाकर्ते अवमान याचिका दाखल करण्याची नुसती भाषाच करत असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका दाखल करू नये, यासाठी तडजोडी सुरू झाल्या असून, जिल्ह्यातील बड्या राजकीय मंडळींनी यात लक्ष घातल्याने याचिकाकर्तेही नरमल्याचे समजते. कोल्हापूर बाजार समितीच्या अशासकीय मंडळाबाबत आपल्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्याची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. -डॉ. सुभाष माने, (पणन संचालक,पुणे)