शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘इमेगो’ची मामी, इफ्फीसाठी निवड, आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटीसाठीही नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:27 IST

कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, विक्रम पाटील, ऐश्वर्या घायदार, विकास दिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘इमेगो’ची मामी, इफ्फीसाठी निवडआॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटीसाठीही नामांकन

कोल्हापूर : कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, विक्रम पाटील, ऐश्वर्या घायदार, विकास दिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.दळवीज आर्टस् इन्स्टिट्यूट, कलानिकेतन संस्थेमध्ये कलाशिक्षण घेत असताना त्यांनी ‘अलोन’, ‘दगडफूल’, ‘पोल्युट’ अशा लघुपटांतून आपल्या संवेदनशील कलाकृतींची चुणूक दाखवली होती. दरम्यान, त्यांना ‘इमेगो’ चित्रपटाची संकल्पना सुचली. कोड किंवा अंगावर पांढरे डाग असलेल्या व्यक्तींच्या जीवनानुभावर हा चित्रपट बेतला आहे.

ऐश्वर्या घायदार यात मुख्य भूमिकेत असून तिने स्वत: हा संघर्ष सोसला आहे. त्यामुळेच अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही तिने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. तब्बल चार वर्षांच्या परिश्रमानंतर हा चित्रपट विविध महोत्सवांत झळकत आहे.वेगळ्या धाटणीतला चित्रपट असला तरी त्यासाठी निर्माता मिळत नव्हता अखेर राजेंद्र यादव तयार झाले. आता मला या चित्रपटाचा निर्माता असल्याचा अभिमान आहे, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गीतांची जबाबदारी सरिका पाटीलने सांभाळली असून अनिकेत मंगळूरकर यांनी संगीत दिले आहे. यावेळी मयूर कुलकर्णी यांनी डिझाईन केलेल्या पोस्टरचे यावेळी अनावरण झाले. परिषदेस ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, डॉ. अनमोल कोठाडिया, रावसाहेब चिकलवाले आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर