शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हातकणंगलेत एकही गाव शेततळ्यास पात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 23:35 IST

जाचक अटींचा परिणाम : योजना फसवी असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रया

दत्ता बीडकर -- हातकणंगले -शेततळ्यासाठी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारीची अट शासनाने घातली आहे. ज्या गावांमध्ये मागील पाच वर्षांत टँकरने पाणीपुरवठा झाला आहे त्या गावांचा शेततळ्यामध्ये समावेश आणि ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली आहे त्यांना प्राधान्य अशा जाचक अटींमुळे हातकणंगले तालुक्यातील एकाही गावाचा समावेश शेततळ्यासाठी झाला नसल्याने शासनाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना फसवी असल्याची संतप्त प्रतिक्रया तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांमध्ये यावर्र्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. पाऊस नसल्याने खरीप आणि रब्बी पीक हंगामावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. ओढे विहिरी कोरड्या पडल्यामुळे यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कधी नव्हे ते यावर्षी प्रथमच पंचगंगा नदीवर पाणी उपसा बंदी लागू केल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा स्थितीमध्ये शासनाने तालुक्याला टंचाई अंतर्गत एक रुपयाचा निधी दिला नसल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्याची अवस्था दयनीय झाली आहे.शासनाने मागेल त्याला शेततळेची घोषणा केली आहे; मात्र याला तितक्याच जाचक अटी घातल्या आहेत. ज्या गावांची पीक आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. तसेच ज्या गावांमध्ये एखाद्या कुटुंबातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा शेतकऱ्याला शेततळे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा झाला आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. वरील एकाही नियमामध्ये हातकणंगले तालुका बसत नसल्याने तालुक्यातील ६२ गावांमध्ये एकही शेततळे मंजूर झाले नाही. मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवणूक करणारी असल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.हातकणंगले तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही एकाही गावाची पीक आणेवारी महसूल विभागाने ५० पैसे पेक्षा कमी केलेली नाही. शासनाच्या कोणत्याही नियम व निकषाला तालुका पात्र ठरत नाही. शासनाने नुकतीच एक घोषणा केली आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकरी वर्गाच्या डोळ्यांत धूळ फेक करणारी आहे.