शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:20 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम गावा गावात राबवून कोरोनाचा संसर्ग थांबवू, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवू कोरोनाचा, संसर्ग थांबवू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम गावा गावात राबवून कोरोनाचा संसर्ग थांबवू, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी 15 सप्टेंबरपासून राज्य शासनाने सुरु केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 1800 पथकं घरो घरी जावून सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणामधून कोरोना सदृश्य लक्षणं असणाऱ्या नागरिकांना शोधून काढण्यात येत आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं, कोव्हिड-19 ची तपासणी करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.

बाधित रुग्णांना लवकर शोधून लवकर उपचार केले जातील. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिक आणि इतर व्यापारी आस्थापना दोघांचेही सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे. मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही. मास्क नाही तर सेवाही नाही.या उपक्रमाचा उद्देश म्हणजे, एकादा दुकानदार मास्क लावून बसला नसेल तर तिथे ग्राहकांने जायचे नाही. एकादा नागरिक विना मास्क दुकानात आल्यास त्याला वस्तू अथवा सेवा द्यायची नाही. याचे उल्लंघन झाल्यास त्यांना दंड करणं किंवा व्यापारी आस्थापनांची दुकाने काही दिवसांसाठी बंद केले जातील.

याला जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात दुकानांवर, सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात येत आहेत, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. अशाच प्रकारे ही मोहीम फार मोठ्या प्रमाणात राबवूया, जेणेकरुन जनजागृती होईल.

कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही या मोहिमेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक करुन ही मोहीम दुसऱ्या जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मोहीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवून राज्यासमोर आदर्श निर्माण करु,असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर