शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

मागील वर्षीच्या कारभाराशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ६१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.आपल्या प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले, कारखान्यावर २११ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज आहे. आमचा कारभार पारदर्शक व काटकसरीने चालू आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत आम्ही ५५ ते ६० टक्के कमी दराने खरेदी केली आहे. सध्या आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कारखान्यावर एक रुपयांचा खर्च न टाकता सहवीज प्रकल्प ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर उभारणार आहोत. यावर्षी ऊस विकासाला चालना देणारा असून संचालक मंडळाचे ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सभासद व परिसरातील सर्व शेतकºयांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस भोगावतीस पाठवावा तरच आम्हाला जास्तीत जास्त ऊस दर देणे शक्य होईल, असे स्पष्ट केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांनी गत हंगामातील उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत आणखी ३०० रुपये जादा दर देण्याची मागणी केली. तीच मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, आण्णाप्पा चौगले, टी आर पाटील, बाबूराव कोथळकर यांनी लावून धरली. त्यांचा हाच धागा पकडून कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनीही ३०० रुपयांच्या मागणीचा पुनरुच्चारर केला. प्रशासकांच्या १३ महिन्यांच्या काळातील निर्णयांना जबाबदार कोण? असा जाब त्यांनी विचारला. त्यावर बोलताना माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांनी कारखान्यावर कर्ज नव्हते म्हणणाºयांनी श्वेतपत्रिका काढावी कर्जाचा आकडा २५० कोटींच्या खाली आला तर जाहीर माफी मागतो, असे जाहीर आव्हान माजी चेअरमन यांना दिले. त्यानंतर विद्यमान चेअरमन यांनीच श्वेतपत्रिका काढण्याची सूचना माजी चेअरमन यांनी मांडली. त्याबाबत बोलताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी त्या कारभाराला प्रशासकाबरोबरच माजी चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले.विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक अनंत निकम व मागील सभेचा इतिवृतांत वाचन कार्यालयीन प्रमुख बळीराम पाटील यांनी केले. सभेतील चर्चेत माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, संतोष पोर्लेकर, सुरेश कुसाळे, निवास डकरे, भिवाजी पाटील, लहुजी कुसाळे, एकनाथ भोसले, बी. जी. खांडेकर, सदाशिव खडके आदींनी सहभाग घेतला. सभेला उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व आजी माजी संचालक मंडळ, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे व उदय पाटील सडोलीकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सडोलीकर, कारखान्याचे माजी चेअरमन संभाजीराव पाटील-सडोलीकर, माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, रघुनाथ जाधव, नामदेव पाटील, हंबिरराव पाटील, एम. आर. पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, राधानगरीचे उपसभापती रविश पाटील- कौलवकर, करवीरचे उपसभापती विजय भोसले, आदी उपस्थित होते.मिशी आणि खरकटे !‘भोगावती’च्या वाताहतीला विस्तारवाढीपासून सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कारभाºयांनी कारखान्यातील भ्रष्टाचाराचे खरकटे मिशीला लागले नसल्याचे जाहीर करावे, असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील दिले. त्यावर बोलताना आजपर्यंतच्या काळात माझ्या मिशीला खरकटे लागू दिले नसून, पाच वर्षांच्या काळात ही खरकटे लागू देणार नसल्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले.