गावातील भाजीपाला व्यावसायिकांनी सकाळी ७ ते ११ पर्यंत फिरून भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. ११नंतर भाजीपाला विक्री करता येणार नाही. मेडिकल्स वगळता कोणताही व्यवसाय ७ ते ११नंतर सुरू राहणार नाही, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. नियमाचे उल्लंघन करणारे नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडाची व दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
चौकट: रुग्णांची माहिती ग्रामपंचायतीला द्या
शिरोली गावातील खासगी डॉक्टरांकडे कोणत्याही आजारावर रुग्ण उपचार घेत असतील तर त्या रुग्णाची नोंद ग्रामपंचायतला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीला उपसरपंच सुरेश यादव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील,
ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, सलीम महात, तलाठी नीलेश चौगुले, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, संदीप कांबळे, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर,सूर्यकांत खटाळे, रणजीत केळुस्कर उपस्थित होते.