शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बोगस डॉक्टर.. बनावट पदवी: कोल्हापुरातील विनाबेड क्लिनिक नोंदणीविनाच, कोणत्या पदव्यांना मान्यता नाही.. वाचा

By उद्धव गोडसे | Updated: December 23, 2024 18:18 IST

तक्रार आली तरच चौकशी: वर्षभरात केवळ पाच बोगस डॉक्टर सापडले

उद्धव गोडसेकोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गल्लीबोळांत सुरू असलेल्या विनाबेड क्लिनिकची नोंद महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नाही. त्यांच्यावर नजर ठेवणारी सक्षम यंत्रणा नसल्याने बोगस डॉक्टरांचे फावले आहे. सहज उपलब्धता आणि कमी खर्चात उपचार होत असल्याने त्यांच्याकडे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. यातूनच ते अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट चालवून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक क्लिनिकची नोंदणी आणि तपासणीची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असणे गरजेचे आहे.आरोग्य आणि शिक्षण या दोन व्यवस्था सक्षम असतील तरच दर्जेदार समाजनिर्मिती होते. त्यामुळे जगभरात अनेक देशांनी या दोन व्यवस्थावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दुर्दैवाने आपल्याकडे या दोन्ही यंत्रणांची अवस्था न सांगण्यासारखीच आहे. यातच बोगसगिरी करून नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांची संख्या वाढल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. ॲलोपॅथी आणि होमीपॅथी उपचार पद्धतींना शासनाने मान्यता दिली आहे. याशिवाय युनानी, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर आणि हिप्नोथेरपीला काही अटींसह मान्यता आहे. अशा उपचार पद्धतीत ॲलोपॅथीची औषधे किंवा इंजेक्शन देता येत नाहीत.तरीही अनेक डॉक्टर ॲलोपॅथी उपचार पद्धती आणि औषधांचा वापर करतात. यात रुग्णांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. असे उपचार करणारे बहुतांश बोगस डॉक्टर गल्ली-बोळांत क्लिनिक थाटून बसले आहेत. त्यांची शासन दरबारी कुठेच नोंद नसते. घराजवळ आणि कमी खर्चात उपचार मिळत असल्याने रुग्णांना त्यांच्या पदवीबद्दल किंवा उपचार पद्धतीबद्दल देणेघेणे नसते; मात्र यातूनच बोगस डॉक्टरांनी पाय पसरले आहेत. रुग्णांचा विश्वास संपादन करून ते अनेक गैरप्रकार करतात.तपासणीची जबाबदारी आरोग्य विभागाची

बोगस डॉक्टरांची तपासणी करून त्यांचा अहवाल देण्यासाठी तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. महापालिका क्षेत्रात ही जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे असते. त्यांनी दर महिन्याला बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्याचा अहवाल ५ तारखेच्या आत वरिष्ठांकडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, यातून बोगस डॉक्टर सापडत नाहीत, हे विशेष आहे.

पाच बोगस डॉक्टरांवर कारवाईगेल्या वर्षभरात आरोग्य अधिकाऱ्यांनी पाच बोगस डॉक्टरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. विशेष म्हणजे यातील बहुतांश कारवाया गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या संशयावरून केलेल्या छापेमारीनंतर झाल्या आहेत. शेकडो बोगस डॉक्टर कार्यरत असताना वर्षभरात केवळ पाचच डॉक्टर सापडतात, हे न उलगडणारे कोडे आहे.

या पदव्यांना मान्यता नाहीशासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इलेक्ट्रोपॅथीची पदवी घेतली असल्यास संबंधितास स्वत:चा उल्लेख कुठेच डॉक्टर असा करता येत नाही. ते केवळ इलेक्ट्रोपॅथीनुसारच उपचार करू शकतात. युनानी, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर थेरपीलाही अटींसह मान्यता आहे. MCI, MMC, MCIM, MCH, CCH, DCI, MDC या पदव्यांना शासनाने मान्यता दिलेली नाही. अशा पदव्यांसह किंवा बनावट पदव्यांचे प्रमाणपत्र वापरून कोणी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्यास त्यांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठोस धोरण गरजेचेनागरिकांच्या जिवाशी खेळ होऊ नये, यासाठी सर्व क्लिनिकना आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक असावे. दरवर्षी त्यांची तपासणी व्हावी. बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे धोरण तयार व्हावे, अन्यथा यातील गैरप्रकार वाढण्याचा धोका आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर