शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत फेरीवाल्यांवर कारवाई नको : सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:30 IST

Muncipal Corporation, Diwali, Kolhapurnews कोरोना आणि लॉकडाऊनने गेल्या सहा महिन्यांपासून फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी असून या कालावधीत एकाही फेरीवाल्यावर कारवाई करू नका, अशी मागणी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावीतने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणालाही मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासंदर्भातील बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्दे दिवाळीत फेरीवाल्यांवर कारवाई नको : सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्याची मागणीमहापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासंदर्भातील बैठक

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने गेल्या सहा महिन्यांपासून फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी असून या कालावधीत एकाही फेरीवाल्यावर कारवाई करू नका, अशी मागणी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावीतने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणालाही मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासंदर्भातील बैठकीप्रसंगी ते बोलत होते.माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, कोरोनामुळे फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळीमध्ये कारवाई करणे योग्य होणार नाही. महाद्वार रोड, पापाची तिकटी येथे महापालिकेने पट्टे मारून द्यावेत. फेरीवाल्यांनी रस्ता अडवून कुठेही बसावे, वाहतुकीची कोंडी करावी, अशी भूमिका नाही.माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी शिवाजी चौकातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यावरून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, गटनेते अजित ठाणेकर, दिलीप पोवार,रघुनाथ कांबळे उपस्थित होते.सर्वेसाठी कागदपत्रांची मागणी होत आहे. काहींकडे रेशनकार्ड उपलब्ध नाहीत तर काहींची रेशनकार्ड विभक्त केली नसल्यामुळे अडचणी येत आहेत. आता सर्व्हे झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षे होणार नाही. त्यामुळे कागदपत्रांसाठी कालावधी दिला पाहिजे, अशी सूचना माजी नगरसेवक अशोक भंडारी यांनी केली.मुदतवाढीला नकारपथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत असल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम युद्धपातळीवर करावे, असे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यानी सांगितले. त्यावर कृती समितीने मुदतवाढीची मागणी केली. सर्व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आयु्क्त डॉ. बलकवडे यांनी म्हटले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी