शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
3
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
4
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
5
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
6
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
7
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
8
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
9
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
10
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
11
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
12
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
13
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
14
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
15
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
16
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
17
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
18
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
19
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
20
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

प्रकल्प खर्चात महापालिका ‘फेल’

By admin | Updated: January 19, 2015 00:50 IST

नोव्हेंबरअखेर ७३७ पैकी १२६ कोटी खर्च : सल्लागार कंपनीसह प्रशासकीय व राजकीय दुबळेपणाचा परिणाम

संतोष पाटील - कोल्हापूर -पंचगंगा प्रदूषण, सुजल अभियान, दुधाळी व कसबा बावडा एसटीपी, नगरोत्थान, पावसाळी पाणी नियोजनासह पाईपलाईन योजनेसाठी २००८ पासून २०१४ पर्यंत महापालिकेला तब्बल ७३७ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मिळाला. मात्र, प्रत्यक्षात १२६ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात प्रशासनाला यश आले. सल्लागार कंपनीसह प्रशासकीय व राजकीय दुबळेपणामुळेच प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे.२०१४-१५ च्या अंदाजपत्रकात पंचगंगा प्रदूषण, नगरोत्थान योजना, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट, केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण, कळंबा तलाव सुशोभीकरण, आदी २२३ कोटींच्या प्रकल्पासाठी १५० कोटी खर्चाचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, प्रत्यक्षात डिसेंबरअखेर ७३ कोटी रुपयेच खर्च झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नगरोत्थान योजनेतून तीन वर्षांपूर्वी १०८ कोटींचा निधी मिळाला. पैकी ९० टक्के निधी खर्च होणे अपेक्षित असताना ३० कोटीच खर्च करण्यात यश आले. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा निधी दोन वर्षे रेंगाळला. ७५ कोटींतील ६० कोटी खर्च उद्दिष्टापैकी फक्त २८ कोटीच निधी खर्ची पडला. दुधाळी एस.टी.पी.साठी १० जून २०११ रोजी आलेल्या २६ कोटी ६१ लाख निधीपैकी फक्त २६ लाख रुपये खर्ची पडले; तर बावडा एस.टी.पी.च्या ७५ कोटी ५८ लाखांपैकी बहुतांश निधी खर्ची पडूनही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, याचा प्रश्न आहे.भोसले नाट्यगृहाचे १० कोटींचे काम सुरू आहे. मात्र, कळंबा तलावासाठीच्या आठ कोटी निधीस हातही लागलेला नाही. आता दोन महिन्यांत दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे. पंचगंगेचे प्रदूषण या ऐरणीच्या प्रश्नावर पालिका प्रशासन उदासीनच आहे.थेट पाईपलाईनसाठी केंद्र व राज्याकडून आलेल्या १७० कोटी रुपयांपैकी फक्त ९९ लाख २८ हजार रुपयेच खर्च झाले. विविध परवानगींच्या तिढ्यात अडकल्यानेच पाईपलाईनचे पैसे पडून आहेत.प्रकल्प व खर्चाचा तपशीलप्रकल्पनिधी मंजूर दिनांकनिधी रक्कमप्रत्यक्ष खर्च रंकाळा तलाव संवर्धन१३/८/२००८१२.१० कोटी१०.९२ कोटीसुजल निर्मल अभियान२३/०३/२०१०१५.९२ कोटी१४.४८ कोटी पंचगंगा प्रदूषण मुक्ती१६/११/२००९७४.२९ कोटी४१.६९ कोटीदुधाळी एसटीपी१०/६/२०११२६.६१ कोटी००.२६ कोटीनगरोत्थान (रस्ते प्रकल्प)१०/६/२०१११०८ कोटी२९.९० कोटी स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट0३/४/२०१२७५.५८ कोटी२८.३६ कोटीभोसले नाट्यगृह नूतनीकरण0३/६/२०१११० कोटी५ कोटी (अंदाजे)क ळंबा परिसर सुशोभीकरण0१/७/२०१२0८ कोटी—निधी खर्च करण्यासाठी दोन ते पाच वर्षांची मुदत असते. डिसेंबर ते फेबु्रवारी या चार महिन्यांत १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च पडणार आहे. त्याची बिले येणे सुरू असून मार्चपर्यंत अधिकाधिक निधी खर्च करण्याचा प्रयत्न आहे.- संजय सरनाईक,मुख्य लेखाधिकारी, महापालिकापालिका मालामालगेल्या तीन वर्षांत महापालिकेला ठेवींच्या व्याजाच्या रूपाने मोठी रक्कम मिळाली आहे. मागील वर्षी सव्वादोन कोटी रुपये व्याजातून मिळाले. यावर्षी किमान चार कोटी रुपये मिळणार आहेत. प्रकल्प रखडले असले तरी महापालिका मात्र व्याजामुळे मालामाल होत आहे.